1. बातम्या

कृषि तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमधील विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावेत

परभणी: विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञानाचे मुल्‍यमापन करणे व हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याची महत्त्वाची भुमिका कृषि विज्ञान केंद्रावर असुन शेतकऱ्यांमध्ये कृषि तंत्रज्ञानाबाबत विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

KJ Staff
KJ Staff


परभणी:
विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञानाचे मुल्‍यमापन करणे व हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्‍याची महत्त्वाची भुमिका कृषि विज्ञान केंद्रावर असुन शेतकऱ्यांमध्ये कृषि तंत्रज्ञानाबाबत विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाड्यातील बारा कृषि विज्ञान केंद्राची वार्षिक कृती आढावा कार्यशाळेचे आयोजन विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक 5 व 6 मार्च रोजी करण्‍यात आले असुन कार्यशाळेच्‍या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते

व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकरविद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एस. राठोडमुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होतीकुलगुरू डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले कीदर्जेदार फळपिकांच्या रोपांची व बियाण्‍याची शेतकऱ्यांमध्‍ये मोठी मागणी असुन प्रत्‍येक कृषि विज्ञान केंद्रानी आपआपल्‍या प्रक्षेत्रावर फळपिकांची रोपवाटीका विकसित करावीयात आंबामोसंबीडाळिंब आदी फळपिकांच्‍या रोप निर्मितीवर भर द्यावातसेच जैविक खतेजैविक कीडनाशकेगांडुळ खत आदी निविष्‍ठांची निर्मिती करून विक्री करावीकेंद्राच्‍या प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण व तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके आदर्श पध्‍दतीने राबवुन शेतकऱ्यांमधील कृषि तंत्रज्ञान अवलंब वाढीसाठी कार्य करावेअसा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ. देवराव देवसरकर यांनी कृषि विज्ञान केंद्रानी बदलत्‍या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानआंतरपिक पध्‍दतीविद्यापीठ विकसित जैवसमृद्ध बाजरी व ज्‍वारीची वाण आदी प्रसारावर भर द्यावा असे सांगितलेसुत्रसंचालन डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ. किशोर झाडे यांनी मानलेदोन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठातील विभाग प्रमुखविद्यापीठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन कृषि विज्ञान केंद्राचा वार्षिक कृती आढावा घेऊन पुढील वर्षाचा कृती कार्यक्रम निश्चित करण्‍यात येणार आहेकार्यशाळेत मराठवाडयातील बारा कृषि विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्‍वयक व विषय विशेषज्ञविद्यापीठातील शास्‍त्रज्ञअधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

English Summary: The KVK should strive to increase the credibility of the farmers regarding agricultural technology Published on: 10 March 2020, 08:26 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters