सध्या एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे तो म्हणजे 19 जानेवारी 1990 ज्याला The Night Of Terror या नावाने देखील ओळखले जाते.या दिवशी काश्मिरी पंडितांच्या हत्यांनी सगळा भारत हादरला होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आधारित द काश्मीर फाइल्स सिनेमा आहे. यामध्ये काश्मिरी पंडितांचे झालेल्या हाल आणि त्यांचे दुःख हे सांगण्यात आले आहे. हे पाहून आपल्या देखील अंगावर काटा उभा राहतो. हा सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदर या सिनेमावरप्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर राजकारण देखील भरपूर प्रमाणात झाले. इतक्या अडचणी येऊन देखील या सिनेमाने आपली छाप लाखो लोकांच्या हृदयावर सोडली. उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा, गुजरात आणि कर्नाटक तसेच मध्य प्रदेश सरकारने सिनेमाला टॅक्स फ्री केले आहे.प्रेक्षकांकडून या सिनेमाला खूप सारा प्रतिसाद देखिल मिळत आहे.
या सिनेमात कोणत्या गोष्टी आहेत विशेष?
या सिनेमाची पूर्ण कथानक हे काश्मिरी पंडितांवर आधारित आहे. या सिनेमात दाखवले गेले आहे की कोणत्या पद्धतीने काश्मिरी पंडितांना त्रास दिला गेला आणि त्यांना मरणासन्न यातना दिल्या गेल्या.तसेच अनेक दिग्गज कलाकारांनी या सिनेमात भूमिका केली आहे. जसे की अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती त्यासोबत पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मंडलेकर,पूनीत इस्सर इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
या सिनेमाचा दोन दिवसाचा व्यवसाय(2 daysbussiness of the kashmir files)
जर या सिनेमाच्या दोन दिवसाचा व्यवसायाचा विचार केला तर अवघ्या दोन दिवसात 14.35 कोटी चा व्यवसाय केला. जर विचार केला तर 2022 नंतर सगळ्यात जास्त वाढ नोंदविणारा हा सिनेमा आहे.
काश्मिरी पंडित यांचा इतिहास आणि द काश्मीर फाइल्स सिनेमाची अनसुनी कहानी(history of kashmiripanditsand the story of the kashmirfiles movie)
5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताच्या संविधानातील अनुच्छेद 370 काढला गेला.कारण भारतातील अन्य राज्यांना काश्मीर सोबत जोडण्यासाठी चा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न केला गेला. तसेच दुसरा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे काश्मिरी पंडितांना न्याय आणि त्यांनी परत काश्मीर मध्ये परत यावे यासाठी चा एक प्रयत्न होता. यामध्ये सांगितले जाते की जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यातील भांडणानंतर अब्दुल्ला यांना बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले. 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकार असताना शेख अब्दुल्ला परत काश्मीर चे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर एक नवीन अध्याय सुरू झाला.
1980 हे वर्ष येईपर्यंत शेख अब्दुल्ला यांची सेक्युलर प्रतिमा मुळे त्यांना वाटायला लागले की त्यांचे पोलिटिकल कंट्रोल काश्मीरवरून कमी होत आहे आणि येथूनच काश्मीरच्या एकंदरीत वातावरणात बदल होऊ लागला. तीस वर्षानंतर शेख अब्दुल्ला यांच्या सेक्युलर प्रतिमेवर इस्लामचा रंग चढायला सुरुवात झाली. त्यांनी काश्मिरी पंडितांना मुखबीर म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर 1987 सालच्या विधानसभा निवडणुकांची वेळ आणि हेडस निवडणुका यांनी काश्मीर चा इतिहास बदलवून टाकला. एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पार्टी आणि दुसऱ्या बाजूला काही महिन्यान आगोदर उदयास आलेलीM. U. F. या पार्टीत या पार्टीत सरकार विषयी नाखूष असलेले लोक होते. त्यानंतर यामधील अधिकतर सदस्य हे आतंकवादी बनले या काळात MUF ची सरकारच्याविरोधात एक लाट तयार झाली होती. त्यावेळची परिस्थिती अशी होती की MUF चा विजय पक्का होता. सरकारने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हा त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला केला होता आणि यांचेच MLA देखील निवडून आले होते निवडणुकात झालेल्या गोंधळानंतर लोकांचा रागहासरकार आणि राज्य सरकार वरजास्त प्रमाणात होता. MUFचे सय्यद सलाउद्दीन पुढे जाऊन हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मेन कमांडर लीडर बनला. 1988 मध्ये JKLF चा आतंगवाद सुरू झाला हा कालावधी खून खराबा आणि रक्तरंजित असा होता. JKLF ची विचारसरणी भारतापासून वेगळे होण्याची होती परंतु त्यांना पाकिस्थान मध्ये सुद्धा जायचे नव्हते. त्यांची इच्छा होते कि काश्मीरलावेगळे करावे. 14 सप्टेंबर 1989 ला आतंकवाद्यांनी पंडित टीका लाल टपलू जे पेशाने वकील होते आणि स्थानिक बीजेपी चे नेते देखील होते. त्यांची दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या केली. 2 ऑक्टोंबर 1989 मध्ये पंडित निखात गंजू एक सेवानिवृत्त न्यायाधीश होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात JKLF चा फाउंडर मकबूल बट्टयाला फाशीची शिक्षा सुनावली होती. 27 डिसेंबर 1989 मध्ये जर्नलिस्ट वकील याची हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चार जानेवारी 1990 मध्ये उर्दू दैनिक अखबार आफताब मध्ये हिजबूल मुजाहिदीनने एक प्रेस रिलीज टाकले. यामध्ये कश्मिरी पंडित यांच्यासाठी बातमी होती.त्यामध्ये काश्मिरी पंडितांना सांगण्यात आले होते की एक तर तुम्ही आमच्या सोबत या नाहीतर मारले जाल किंवा काश्मीर सोडून चाललेजा. या सगळ्या परिस्थितीमुळे काश्मिरी पंडितांच्या मनात भीती वाढत गेली.
जे लोक यांचे शेजारी होते तेच यांच्या जीवाशी उठले.काश्मीर घाटी मध्ये देशद्रोह आणि गद्दारीदिसून यायला लागली.त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरी लूटमार, चोरी, मुलींवर बलात्कार सारख्या घटना घडायला लागल्या. गल्लीमध्ये धमक्या देणे तर एक सामान्य गोष्ट झाली. या पार्श्वभूमीवर आतंकवाद्यांनी घोषणा काश्मीर आबाद होईल तसेच मस्जिदमधून भडकाऊ भाषण देणे सुरू केले. स्वतःच्या अब्रूला वाचवण्यासाठी बऱ्याच महिला आणि मुलींनी आत्महत्या केली तर काहीवर बलात्कार देखील झाले. तर काही स्वतःच्या अब्रू वाचवून तेथून निसटले. स्वतःच्या देशात त्यांना रेफ्युजी असे म्हटले जाऊ लागले. काश्मिरी पंडितांचे पलायन हे जानेवारी 1990 पासून तर मार्च, एप्रिल पर्यंत चालू होता. मदतीसाठी दिलेला आवाज घातलेली सादनिकामी झाली होती सोबत फक्त होती ती निराशा, अपमान आणि स्वकीयांना हरवल्याचे दुःख.
Share your comments