यंदाचा ऊसाचा गाळप खूप चर्चेचा विषय बनला आहे. या वर्षीचा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरु झाला होता. गेल्या सात महिन्यांपासून हंगाम सुरु आहे. तरी पण सांगली जिल्ह्यात 20 ते 25 हजार हेक्टरावरील ऊसाचे गाळप (Surplus sugarcane) शिल्लक आहे. असे असताना दुसरीकडे ऊसटोळ्यांचा परतीचा प्रवास सुरु केला आहे.
आता साखर कारखान्यांची (Sugar factories) आवरा आवर सुरु झाली आहे. त्यामुळे उर्वरीत ऊसाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कारखान्याची धुराडी बंद करु नये अन्यथा साखर कारखान्याच्या संचालकाच्या घरासमोरच आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केवळ मराठवाड्यातच नाही पश्चिम महाराष्ट्रातही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Summer : उन्हाळा प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने शेळ्या दगावल्या, शेतकऱ्यांनो 'अशी' घ्या काळजी
आनंदाची बातमी : बँकेची कर्जमर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ
यंदा राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाऊस मुबलक झाल्याने दुष्काळी भागात ही उसाचे क्षेत्र वाढले आहे. मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्यानेच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव नागेवाडी महाकाली आणि माणगंगा केन अग्ग्रो हे पाच कारखाने बंद आहेत.
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
उसाचे पीक वाढले आणि पाच कारखाने बंद पडले त्यामुळे ऊस गाळप झालेला नाही. अंतिम टप्प्यातही ऊसतोडीचा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांचा विचार करुन गाळपाचा कालावधी वाढवावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
नुकसान भरपाई : शेतकऱ्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार गोड बातमी..!
शेतकरी संतापला! थेट मार्केटच केले बंद, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
Share your comments