यंदा पावसाने अनेकांचे अंदाज चुकवले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. खरीपाची पिकं वाचवण्यासाठी राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
असे असताना राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
Share your comments