MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

कोरोना काळात वाढतेय औषधी वनस्पतीचे महत्व, दीड कोटींपर्यंत झाले व्यवहार; कमवा करोडो..

देशासह जगात सध्या कोरोनाचे मोठे संकट अजूनही आहे. याचा मृत्यूदर काहीसा कमी झाला असला तरी अजूनही अनेकांचे मृत्यू होत आहेत. याकाळात अनेक औषधे आली मात्र अजूनही त्यावर प्रभावी असे औषध आले नाही. यामुळे अनेकांनी औषधी वनस्पती घेऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
gulvel

gulvel

देशासह जगात सध्या कोरोनाचे मोठे संकट अजूनही आहे. याचा मृत्यूदर काहीसा कमी झाला असला तरी अजूनही अनेकांचे मृत्यू होत आहेत. याकाळात अनेक औषधे आली मात्र अजूनही त्यावर प्रभावी असे औषध आले नाही. यामुळे अनेकांनी औषधी वनस्पती घेऊन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली. यामुळे याची मागणी देखील वाढली. यामुळे यामधून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले. सध्या तिसऱ्या लाटेमध्ये ही मागणी अधिक वाढलेली आहे. नर्सरीमध्ये औषधी वनस्पतीची टंचाई निर्माण होत असून यावरुनच मागणीचा अंदाज लक्षात येईल. यामध्ये बघितले तर गेल्या दीड वर्षात गुळवेल सर्वाधिक मागणी वाढली आहे. याची टंचाई देखील अनेक ठिकाणी बघायला मिळाली. अनेक नर्सरीमधून हजारो वनस्पतींची विक्री झाली आहे.

तुळस आणि काळमेघलाही अधिकची मागणी होत आहे. गुळवेलमुळे मधुमेहावर नियंत्रण राहते व ते एकअँटी व्हायरल घटक असल्याचा दावा केला जात आहे. गिलॉयच्या रसामुळे रक्तातील साखर कमी होते, शिवाय पोटाच्या आजारांपासून सुटका होते. कोरोना काळात या आजारांनी जे आधीच त्रस्त होते, त्यांना जास्त धोका होता. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले. यामुळे या वनस्पतींना मोठी मागणी होती. गुळवेलमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतो, यामुळे अनेकांनी शहरी भागात देखील याची लागवड केली. काळमेघ एक औषधी वनस्पती आहे, ज्याचा वापर अधिकची ताप आली तर केला जातो.

मलेरिया, टायफॉइडसाठीही याचा वापर होतो. हे रक्त स्वच्छ करते म्हणून हे त्वचारोग आणि कुष्ठरोगाच्या उपचारांमध्ये देखील खूप उपयुक्त आहे. त्याशिवाय कडुनिंब, अश्वगंधा आणि जंगली हळद अशा अनेक वनस्पती असून, त्यांची मागणी वाढली आहे. अनेकांनी याची विक्री करून पैसे देखील कमवले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रातील एका आदिवासी गटाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गुळवेल पुरवण्याची ऑर्डर मिळाली होती. वैद्यनाथ, डाबर, हिमालय या कंपन्यांकडून ही ऑर्डर मिळाली होती.

यासाठी 1 हजार 800 हून अधिक नागरिकांनी एकत्र काम केले होते. यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाला होता. तसेच तुळस देखील मोठ्या प्रमाणवर विकली गेली. याची पाने कोरडी किंवा चहामध्ये टाकली जातात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठी मदत झाली. शहरी भागात याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे समोर आले. मुंबई महापालिकेच्या एका अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे. अनेकजण यामध्ये पैसे कमवत आहेत, तिसऱ्या लाटेमध्ये ही मागणी अधिक वाढलेली आहे.

English Summary: The importance of the growing medicinal plant during the Corona period, up to one and a half crore transactions; Earn crores .. Published on: 27 January 2022, 02:21 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters