दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि कृषी क्षेत्रावर ही बर्या प्रमाणात होताना दिसत आहे. आंदोलनाच्या सुरवातीच्या काळात जिल्ह्यातून जाणाऱ्या जीवनावश्यक ठरणाऱ्या टोमॅटो कांदा इत्यादी भाजीपाल्यांच्या वाहनांना आंदोलकांनी सहजरित्या प्रवेश दिला होता. मात्र आता अडचणी वाढताना दिसत आहेत.
हजारो आंदोलन करणारे शेतकरी रस्त्यावर असल्याने दिल्लीकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिक हुन भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन निघालेल्या वाहनांनाही दिल्लीत पोहोचता येत नसून परतता येत नसल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जर नाशिकचा विचार केला तर, नाशिक मधून हरियाणा, दिल्ली, इत्यादी राज्यांमध्ये औद्योगिक कच्चामाल, तयार उत्पादने यासह कृषी उत्पादने जसे की टोमॅटो, कांदा येथे पाठवले जातात.
हेही वाचा :पंतप्रधानांनी कृषी कायद्याविषयीचा भ्रम केला दूर
परंतु दिल्लीत जाणारे रस्ते शेतकरी आंदोलनामुळे ब्लॉक झाल्याने समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अगोदर आंदोलन करते शेतकरी जीवनावश्यक वस्तूंच्या मालाला सहजरित्या रस्ता करून देत होते. परंतु कालांतराने आंदोलनाची धार वाढल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असून वाहनांना धड मागे आणि पुढे ही फिरायला समस्या येत आहे.
Share your comments