पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शेतकरी कंपनीकडून अनोखा प्रकल्प राबवला गेल्याने शेतकरी आणि अनाथ मुले या दोघांनाही धीर मिळाला आहे. थेट शेतकरी कंपनीकडून अन्नधान्य घेऊन अनाथ आश्रमाने शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांनी शेतमालतुन मिळालेल्या उत्पन्नापैकी अनाथ आश्रमाला मदत करण्याचा करार केल्याने शेतकरी व अनाथ मुलांना कायमस्वरूपी मदतीचा हात मिळाला आहे.
पुणे, शिवाजीनगर येथील साखरसंकुल येथे धान्य महोत्सवात फार्महँड प्रकल्पाचा स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन अशा अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.
पुणे परिसरातील अनेक आश्रमात ६ महिन्याच्या बाळापासून तरुण मुली, मुले यांचा समावेश आहे. या आश्रमाना शाश्वत मदत मिळेल व शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल असा विचार करून फार्महँड ब्रँडने डेअरी व फूड प्रोसेसिंग कंपनीने " मेहेरा डेअरी आणि फूड प्रॉडक्ट" या नावाने कंपनीची सुरवात केली.
त्यासाठी त्यांनी पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील ज्ञानेश्वर फडतरे व तेथील शेतकऱ्यांच्या " ग्रामविकास शेतकरी कंपनीला" सहकार्य करून शेतकऱ्यांचा शेती माल घेण्यासाठी करार केला. या माध्यमातून होणारा व्यवसाय व यातून मिळणारे उत्पन्न यातील काही रक्कम ही आश्रमातील मुलांना देण्याचे निश्चित करुन विक्री सुरु करण्यात आली.
46 कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?
परिसरातील अनाथ आश्रमांना दर महिना १२ हजार ते १५ हजार किलो लागणारे राशन देण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी कंपनीच्या महिला सहकारी आणि कर्मचारी हा माल घेऊन पॅक करून अनाथ आश्रमना पोचवतात. याबाबत सर्व आर्थिक सहकार्य फार्महँड कंपनी पुरवत आहे. पद्मश्री विजेत्या कै. सिंधुताई सपकाळ यांच्या सासवड जवळील व पुण्यातील आश्रमासह १५ आश्रमातील ९५० अनाथ मुलांना दर महिन्याला लागणारे राशन कंपनी तर्फे पुरवले जात आहे.
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
सन २०२५ पर्यंत १० हजार मुलांना हे राशन मिळेल असे ध्येय समोर ठेवून फार्महँड काम करत असून यात काही लोक पूर्ण वेळ काम करीत आहेत. फार्महँड व ग्रामविकास शेतकरी कंपनीने बोपगाव येथे वितरकांचे प्रशिक्षण घेऊन अनेक दुधाचे पदार्थ, मसाले, पल्प, कडधान्य व डाळी असे प्रॉडक्ट लॉन्च केले.
यात वितारकांनी पूणर्पणे सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यामुळे फार्महँडच्या प्रॉडक्ट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विक्रीतून पुढे शेतकऱ्यांकडून शेतीमाल घेऊन तो प्रोसेसिंग करून यातील काही रक्कम व माल गेल्या ८ महिन्यापासून अनाथ आश्रमास दिला जात असल्याची माहिती फार्महँड कंपनीच्या संचालकांकडून देण्यात आली आहे.
Share your comments