साखरेच्या उत्पादनामध्ये प्रत्येक आठवड्याला देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था साखर उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त करत आहेत. या अंदाजाचा अनिष्ट परिणाम व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर अस्थिर होण्यावर होत आहे.
विविध संस्थान मार्फत साखर दरवाढीचा अंदाज ठराविक दिवसाला व्यक्त होत असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम हा वाढलेले दर कमी होण्यावर होत आहे. या संस्थांच्या अंदाजामुळे मात्र साखर बाजारांमध्ये अनिश्चितता येत आहे. जर शुक्रवारचा विचार केला तर साखरेचे भाव दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. जर सध्याच्या साखरेच्या किमतींचा विचार केला तर भारत आणि थायलंडमध्ये होणार असलेले जादा उत्पादन ब्राझील मधील साखर उत्पादनातील झालेला तोटा भरून काढतील या अपेक्षेने साखरेच्या किमतीवर सध्या दबाव आहे.याबाबतीत साखर उद्योगाच्या काही सूत्रांनी सांगितले की, ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने गुरुवारी 20 जानेवारीला भारतातील हंगाम 2021-22 मध्ये साखर उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 2.9 टक्क्यांनी वाढून 319 लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि तीन जानेवारीला अहवाल दिला की, 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत भारताचे साखर उत्पादन हे 4.3 टक्क्यांनी वाढेल.
केन अँड शुगर बोर्डाच्या थायलँड कार्यालयाने 10 जानेवारीला अहवाल दिला की सात डिसेंबर 2021 ते 6 जानेवारी 2022 दरम्यान थायलंडमधील 2021 22 च्या हंगामात साखर उत्पादन 58 टक्क्यांनी वाढले आहे. थायलंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे.या संस्थांच्या अंदाज आतून जागतिक बाजारपेठेत जादा साखर येण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना 20 जानेवारी पर्यंत साखरेच्या दरात वाढ होत होती. परंतु 20 जानेवारीला ऑल इंडियाशुगर ट्रेड असोसिएशनने भारतातील साखर उत्पादनात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केल्यानंतर साखर दरात घसरण झाली.
त्यासोबतच आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने जागतिक पातळीवर हंगाम 2021 22 मध्ये 25.5 लाख टन साखर तुटवडा भासेल असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बाजारपेठेतील मोठ्या खरेदीदार कंपनीकडून भारतातील साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतीय साखरेला कायमच मागणी आहे व या कंपन्या वायदे बाजारातील दराप्रमाणे साखर खरेदी करतात. ( माहितीस्त्रोत- ॲग्रोवन )
Share your comments