हंगामाच्या सुरुवातीस मोठ्या क्षमतेने जिनिंग सुरू झाले होते जे की बाजारात कापसाला चांगल्या प्रमाणत दर सुद्धा मिळत होता त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले होते. परंतु अचानक हंगाम निम्यावर असताना कोरोना चा नवीन व्हेरियंट ओमीक्रोनचे थैमान सुरू असल्याने जिनिंग उद्योग कुठे तरी थंडावलेला दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा व्यवहार थंडावले असल्यामुळे याचा परिणाम डायरेक्त राज्यातील जिनिंग उद्योगावर दिसून येत आहे. सध्याच्या घडीपर्यंत राज्यातील ५०० जिनिंग प्रोसेसमधून जवळपास २२ लाख गाठीची निर्मिती झालेली होते. यावेळी २२ लाखाहुन ७० लाख गाठी निर्मित होतील असा अंदाज हंगामाच्या सुरुवातीस केला होता. परंतु सध्या ओमीक्रोन चा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच नाताळ सणाच्या व कापसाचे अनिश्चित दर या सर्व कारणांमुळे कापूस निर्मितीवर परिणाम होत आहे.
जोखीम घ्यायची कोणी:-
दिवसेंदिवस वाढत असलेला ओमीक्रीन चा प्रादुर्भाव तसेच युरोप देशामध्ये सुरू असलेल्या नाताळ च्या सुट्या आणि कापूस दराबाबत अनिश्चितता पाहून जिनिंग उद्योग संथ गतीने सुरू आहेत. आता पर्यंत राज्यातील ५०० जिनिंग प्रोसेसिंग युनिट ने २२ लाख गाठी निर्माण केल्या आहेत. हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर तसेच आवक ही चांगल्या प्रकारे होती मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे कापूस उत्पादक कारखानदार सावधगिरी बाळगत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार थंडावले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी यामध्ये जोखीम कोण घेणार यामुळे कापसावरील प्रक्रिया रखडलेल्या आहेत.
शेतकऱ्यांचा कलही साठवणूकीवरच:-
कापसाचे हाल सुद्धा सोयाबीन पिकासारखे च झालेलले आहेत जसे की हंगामाच्या सुरुवातीला कापसाला ९५०० रुपये चा दर मिळाला मात्र आता दर घटल्यामुळे बाजारामध्ये सुद्धा आवक कमी झालेली आहे. शेतकरी सध्या वाढत्या दराची अपेक्षा ठेवून बसले आहेत. कापूस विक्री करण्यापेक्षा शेतकरी आता साठवनुक करायला लागले आहेत. उत्पादन वाढावे म्हणून एका बाजूला शेतकरी फरदड कापसाचे उत्पादन घेत आहे तर दुसऱ्या बाजूस चांगला दर भेटावे म्हणून शेतकरी कापसाची साठवणूक करत आहेत.
खेडा खरेदी केंद्रातून होतो कापसाचा पुरवठा:-
राज्यातील जेवढे जिनिंग उद्योग आहेत त्या केंद्रांना खेडा येथील केंद्रातून कापसाचा पुरवठा केला जातो मात्र ओमोक्रोनमुळे आंतरराष्ट्रीय बाजार थंडावलेला आहे आणि यामध्ये युरोप तसेच अमेरिकामध्ये नाताळ सणाचा माहोल असल्यामुळे बाजार थंडावलेला आहे. यामुळे ज्या कारखान्यातून ४०० गाठीची निर्मिती होते ती आता २०० गाठींवर येऊन बसली आहे.
Share your comments