राज्यात खरीप हंगामात (In the kharif season) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. महाराष्ट्राला प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य (Soybean producing state) म्हणून ओळखले जाते, मात्र असे असले तरी या खरीप हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या होती बियाण्याची, बियाणांची कमतरता असल्याने सोयाबीनचा पेरा हा सर्वसाधारण झाला तसेच अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (To soybean growers) चढ्या दराने बियाण्यांची खरेदी करावी लागली होती. म्हणून आगामी खरीप हंगामात या खरीप हंगामासारखी सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासू नये या अनुषंगाने शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात महाबीजच्या मदतीने सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी आणि बियाणे संवर्धन देखील करावे. शासनाने दिलेल्या सल्ल्याचे महत्व ओळखून नंदुरबार जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात विक्रमी पेरा केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 145 हेक्टर क्षेत्रावर विक्रमी सोयाबीनची पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सल्ल्यानुसार आणि महाबीज च्या मदतीने नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला विशेष प्राधान्य दिले. जिल्ह्यात झालेली विक्रमी सोयाबीन पेरणी बघता आगामी खरीप हंगामात तरी सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नाही अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सध्या शेतकरी बांधव सोयाबीन वाढीसाठी व्यवस्थापन करत आहे तसेच अनेक शेतकरी बांधव सोयाबीन पेरणीची (Soybean sowing) लगबग करताना नजरेस पडत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात या खरीप हंगामात सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाल्याचे नमूद करण्यात आले होते, मात्र असे असले तरी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे टंचाईला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे सोयाबीनचा पेरा यापेक्षा देखील अधिक झाला असता असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामात सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला होता त्यामुळे उत्पादनात घट झाली होती मात्र सोयाबीनला समाधानकारक बाजार भाव मिळाल्याने उत्पादनात झालेली घट भरून निघाल्याचे चित्र बघायला मिळाले. या हंगामात समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी गदगद झाले आहेत आणि आगामी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापासून तयारी करत बियाणे संवर्धनासाठी उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र उन्हाळी हंगामात पेरल्या गेलेल्या बेमोसमी सोयाबीनची विशेष काळजी घ्यावी लागते यासंदर्भात राज्यातील कृषी विभाग शेतकऱ्यांना वारंवार सजग देखील करत आहे. उन्हाळी हंगामात पेरलेल्या सोयाबीनला मोठ्याप्रमाणात बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागतो, उन्हाळी हंगामात अवेळी आलेल्या पावसामुळे बेमोसमी सोयाबीनचे नुकसान होऊ शकते त्यामुळे सोयाबीनची विशेष काळजी घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
Share your comments