पुणे : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहेत. शेतीला चालना मिळावी यासाठी शेतीपुरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शेततळ्यांना प्रोत्साहित करण्याचे धोरण सरकारने तयार केले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार कृषी स्टार्ट-अपसाठी मदत करणार आहे.
केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात कृषी प्रक्रिया, कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल शेती शेती आणि यांत्रिकिकरण या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपला केंद्र सरकार यावर्षात २५ कोटी रुपये देणार असल्याचे सरकाराने जाहीर केले आहे.
कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग, कल्पकता आणणाऱ्या उद्योगांना सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत मदत करत आहे. या अर्थी वर्षात केंद्र सरकारने आतापर्यंत ११२ कृषी स्टार अपना १२ कोटींचे अर्थसाहाय्य केले आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून तरुण नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय उभे, राहावे यासाठी प्रयत्न करत आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या आज मोठ्या प्रमाणावर बौद्धिक आणि आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. अनेक उच्छशिक्षित तरुण पुढे येत आहे. त्यांच्यातील उद्योगजकतेला वाव मिळावा यासाठी सरकार त्यांना अर्थसहाय्य करत आहे.
सरकारने एकूण ३४६ कृषी स्टार्टअपला ३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यांना कृषी आणि संबंधित क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रोत्सहित करण्यात आहेत.
Share your comments