जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या सभेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले असल्याचं राऊत म्हणाले आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले.
महिंद्राने लाँच केले कृषी-ई ब्रँड
तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा 'डेथ वॉरंट' निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरलं, असल्याचं राऊत म्हणाले आहे.
दरम्यान आज जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा आहे. या सभेतून मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अनेक विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरे, सरकारला धारेवर धरतील.
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुसाईड बॉम्ब हल्ल्याची धमकी
Share your comments