शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील असते, जे की शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून उसाचा FRP वाढवलेला आहे. मोदी मंत्रिमंडळ व सीसीईएच्या जी बैठक झाली त्या बैठकीत उसाचा FRP ५ रुपये प्रति क्विंटल वाढवण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता जो की या प्रस्तावाला अखेर मोदी कॅबिनेट ने मंजुरी दिलेली आहे.मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये १० टक्केच्या वसुली आधारावर FRP वाढवून २९० रुपये प्रति क्विंटल झालेला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे.
ऊस उत्पादकांना मिळणार वेळेवर पैसे:
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की साखरेची FRP २९० रुपये प्रति क्विंटल झालेली आहे जे की ७० लाख टन साखरेची निर्यात होणार आहे त्यामधील सध्या ५५ लाख टन निर्यात झालेली आहे. इथेनॉल चे मिश्रण प्रमाण ७.५ टक्के ते ८ टक्के झाले आहे मात्र पुढील काही वर्षात ते प्रमाण २० टक्के पर्यंत होणार आहे. जो निर्णय घेण्यात आला या निर्णयामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये साखरेच्या किमतीच्या ९० ते ९१ टक्के ऊस भेटणार आहे याव्यतिरिक्त जगात साखरेच्या किमतीच्या ७० ते ७५ टक्के ऊस मिळतो. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला चांगला दर भेटेल. FRP मुळे ऊस उत्पादकांना ८७ टक्के परतावा मिळणार आहे. तसेच ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे भेटणार आहेत.
हेही वाचा :शालेय अभ्यासक्रमात होणार कृषी विषयाचा समावेश; शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
आत्ता रकमेची नाही पहावी लागणार वाट:
केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की सन २०२०-२०२१ मध्ये ऊस उत्पादकांना ९१ हजार कोटी द्यायचे होते त्यामधील ८६ हजार कोटी देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे ऊस उत्पादकांना रकमेची वाट बघावी नाही लागत. FRP वाढल्याने साखरेचा एमएसपी व इथेनॉल च्या किमतीमध्ये वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि याच फायदा साखर कारखान्यांना होणार आहे.
FRP म्हणजे काय?
FRP म्हणजे ज्यावर साखर कारखाने ऊस उत्पादकांकडून ऊस खरेदी करतात. दरवर्षी FRP ची शिफारस CACP म्हणजेच कमिशन ऑफ एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेज करत असते.मागील वर्षी १० रुपये प्रति क्विंटल FRP मध्ये वाढ करण्यात आली होती त्यामुळे अत्ता २९० रुपये प्रति क्विंटल दर झालेला आहे.
Share your comments