1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी इथून पुढे कधीच भासणार नाही आता युरियाची टंचाई

मागील काही दिवसांपासून रब्बी हंगामात खताची आणि विशेषतः म्हणजे युरियाची टंचाई झालेली होती पण आता ही टंचाई पूर्ण हंगामात भासणार नाही. कारण केंद्रीय खत मंत्रालयाने सुमारे १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.केंद्र सरकारच्या या चांगल्या निर्णयामुळे शेतात दिवसरात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील का दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्रांनी जी शेतकऱ्यांकडून कृत्रिम टंचाई भासवून जी लूट केली होती त्या लुटे ला आता कुठेतरी आळा बसणार आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
urea

urea

मागील काही दिवसांपासून रब्बी हंगामात खताची आणि विशेषतः म्हणजे युरियाची टंचाई झालेली होती पण आता ही टंचाई पूर्ण हंगामात भासणार नाही. कारण केंद्रीय खत मंत्रालयाने सुमारे १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.केंद्र सरकारच्या या चांगल्या निर्णयामुळे शेतात दिवसरात्र कष्ट  करणाऱ्या  शेतकरी  बांधवांना  मोठा  दिलासा  मिळाला  आहे. मागील का दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्रांनी जी शेतकऱ्यांकडून कृत्रिम टंचाई भासवून जी लूट केली होती त्या लुटे ला आता कुठेतरी आळा बसणार आहे.

उत्पादनापेक्षा मागणी अधिक:-

भारतात प्रति वर्ष युरियाचे उत्पादन २५ लाख टन होते पण देशात युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे त्यामुळे दरवर्षी वाढीव युरिया ८० ते ९० लाख टन आयात करावा लागतो. केंद्र सरकार वेळोवेळी गरज तसेच मागणी पुरवठा आणि किमंत करून युरिया आयात करण्यासाठी परवानगी देत असते.एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ च्या दरम्यान चीन कडून सुमारे १० लाख टन युरिया आयात केला गेला आहे. भारत देशाची गरज लक्षात फहेउन चीन ने आता निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे रशिया आणि इजिप्त कडून भारताला आता युरिया आयात करावा लागला आहे.

सध्याच्या स्थितीला रब्बी पिकाची पेरणी शेवटच्या टप्यात पोहचली असून काही राज्यातील शेतकऱ्यांची खताची कमतरता पडत असल्याचे ओरड सुरू झाली आहे.केंद्रीय खत मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने हिंदू बिजनेस लाईनला असा संदेश दिला आहे की पश्चिम किनारपट्टीवरील बंदरावर आयात केलेले १० लाख टन खत येणार आहे तर पूर्व किनारपट्टीवर ६ लाख टन खत येणार आहे. जे आयात केलेले खत आहे ते देशाच्या अंतर्गत असणाऱ्या बाजारपेठेत पोहचवण्याचे काम इंडियन पोटॅश लिमिटेडला दिले आहे.

युरियाचा होतोय अधिक वापर:-

देशात एकूण जेवढी खते आहेत त्या खतांच्या वापरापैकी शेतकरी ५५ टक्के युरिया वापरत आहेत. दुसऱ्या खताची किमंत जास्त तसेच पीकवाढ होत नाही त्यामुळे  शेतकरी  युरिया  वापरणे पसंद करतात. युरिया च्या ४५ किलो बॅग च किमंत किरकोळ बाजारात २४२ रुपये आहे तर ५० किलो बॅग ची किमंत २६८ रुपये आहे.

मागणी आणि झालेला पुरवठा:-

केंद्रीय खत मंत्रालयच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत खरीप हंगामासाठी युरिया ची आवश्यकता  १७  लाख  ७५ हजार  टन  एवढी  होती  तर युरियाची उपलब्धता २० लाख ८२ हजार टन होती.तर सध्या रब्बी हंगामाच्या पेरणी ची मागणी १७ लाख ९ हजार टन आहे परंतु २४ नोव्हेंबर रोजी युरिया ची उपलब्धता ५ लाख ४४ हजार टन होती. अशा स्थितीत रब्बी हंगामासाठी ८० लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

English Summary: The good news for farmers there will never be a shortage of urea Published on: 28 November 2021, 08:33 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters