अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भें डा या गावी एक शेळी तब्बल दीड लाख रुपयांना विकले गेली आहे. ही शेळी ही आफ्रिकन बोर जातीची असल्याचे सांगण्यात आले. भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप परशुराम मिसाळ यांचा शेती सोबत शेळी पालनाचा जोडव्यवसाय आहे.
त्यांच्याकडे असलेली ही शेळी फलटण येथील तेजस भोईटे यांनी तब्बल दीड लाख रुपये मोजून खरेदी केली. शेळीला एवढी किंमत आल्याने गाव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.या शेळीला एवढी किंमत मिळाल्याचे कारणेही अनेक आहेत. त्याबाबतीत मिसाळ यांनी सांगितले की, आफ्रिकेतून आणलेल्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचा गर्भ देशी शेळीच्या गर्भाशयात ठेवून त्यापासून भारतातहि जात वाढवण्यात आली आहे.
या जाती विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, या जातीमध्ये प्रतिकार शक्ती अधिक असते. त्यांची शारीरिक वाढ चांगली होते. दिवसाला साधारणपणे दोनशे ते अडीचशे ग्रॅम त्यांचे वजन वाढते. त्यामुळे आफ्रिकन बोअर जातीच्या बोकड याला चांगली मागणी असते. बोकड चा साधारणतः शारीरिक वाढीचा विचार केला तर तीन महिन्यात बोकड पंचवीस ते तीस किलो वजनाचा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते.
शेळी विकत घेतलेल्या भोईटे यांनी सांगितले की, या जातीच्या शेळ्या एकावेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देतात. काही महिन्यातच त्यांच्याकडून पण लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा असल्याने एवढ्या मोठ्या किमती ला शेळी विकत घेतली असे त्यांनी सांगितले.
Share your comments