सर्व जगभरातील पर्यटक ज्याची वाट बघत असतात, त्या कास पठारचा हंगाम लवकरच म्हणजेच १० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे. असे असताना मात्र गेल्या दोन दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल का नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे.
पठारावरील फुलांचा हंगाम यंदा दहा दिवसांनी उशिरा सुरू होत आहे. सध्या कास पठारावर रानतेरडा या फुलाचे अस्तित्व जाणून येत असून वेगवेगळ्या फुलांच्या फुलण्याचा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षी साधारण 15 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा काळ सुरू होतो. मात्र, यंदा पावसाने लवकर परतीचा प्रवास सुरू केल्याने सध्या परतीच्या टप्प्यात मुसळधार पावसाचा अनुभव येत आहे.
यामुळे सध्या पठारावर पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू करताना अडचणी जाणवत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हंगाम पूर्ण लक्षमतेने सुरु होण्यास पाऊस बंद होण्याची वाट बघावी लागणार आहे. कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
यावर्षी हंगामासाठी साधारणपणे 15 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी वाहने पार्क करू शकतात. पुढील काही दिवसांमध्ये अजून फुले येणार आहेत, तेव्हा कास पठारचे सौंदर्य अजूनच खुलणार आहे.
हा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती तसेच वन विभाग यांच्यावतीने देण्यात आली आहे. परिसरात पर्यटनासाठी अनेक ठिकण आहेत, यामुळे याठिकाणी पर्यटकांची नेहेमी वर्दळ असते.
महत्वाच्या बातम्या;
Onion News: कांदा विक्रीप्रकरणी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आज 'या' जिल्ह्यात अतिवृष्टी होणार! पंजाबरावांचा इशारा...
आयकरच्या धाडीनंतर अभिजीत पाटलांचा मोठा निणर्य, २ वर्षापासून थकीत असलेली 30 कोटींची बिलं देण्यास सुरुवात..
Share your comments