अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एफसीआयची विविध पावले

15 May 2020 10:31 AM By: KJ Maharashtra


नवी दिल्ली:
भारतीय खाद्य महामंडळाच्या 12 मे 2020 च्या अहवालानुसार, एफसीआय कडे सध्या 271.27 एलएमटी तांदूळ आणि 400.48 एलएमटी गहू उपलब्ध आहे. म्हणजेच, एकूण 671.75 एलएमटी अन्नधान्य साठा उपलब्ध आहे (गहू आणि तांदळाची सुरु असलेली खरेदी जी अद्याप गोदामात पोहोचली नाही ती वगळता). एनएफएसए आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत, एका महिन्यासाठी सुमारे 60 एलएमटी धान्य आवश्यक आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून, सुमारे 80.64 एलएमटी अन्नधान्य विविध ठिकाणांहून उचलून 2880 रेल्वे रॅक्सद्वारे त्यांची वाहतूक करण्यात आली आहे. रेल्वे मार्गाशिवाय रस्ते व जलमार्गां मार्फतही वाहतूक केली जात आहे. एकूण 159.36 एलएमटी अन्नधान्याची वाहतूक झाली आहे. 11 जहाजांमधून 15,031 मेट्रिक टन धान्याची वाहतूक झाली आहे. एकूण 7.36 एलएमटी अन्नधान्याची वाहतूक ईशान्येकडील राज्यात करण्यात आली आहे. एनएफएसए आणि पीएमजीकेवाय अंतर्गत पुढील 3 महिन्यांसाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये 11 एलएमटी धान्य आवश्यक आहे.

खुली बाजारपेठ विक्री योजना

लॉकडाऊन दरम्यान, मदत शिबिरे चालविणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था खुली बाजारपेठ विक्री योजना (ओएमएसएस) दराने थेट एफसीआय गोदामामधून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकतात. राज्य सरकारे थेट एफसीआयकडून धान्य खरेदी करु शकतात.

राज्य सरकार बिगैर एनएफएसए कुटुंबाना पुढील तीन महिन्यांपर्यंत तांदूळ/गहू देऊ शकते ज्यांना राज्य सरकारांनी शिधापत्रिका जारी केली आहे. ओएमएसएस अंतर्गत तांदळाचे दर 22 रुपये किलो आणि गहू 12 रुपये किलो निश्चित केला आहे. दरम्यान, लॉकडाऊन कालावधीत एफसीआयने ओएमएसमार्फत 4.68 एलएमटी गहू आणि 6.58 एलएमटी तांदुळाची विक्री केली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

अन्नधान्य (तांदूळ/गहू)

पीएमजीकेयेअंतर्गत, पुढील 3 महिन्यांसाठी एकूण 104.4 एलएमटी तांदूळ आणि 15.6 एलएमटी गहू आवश्यक आहे, त्यापैकी 69.65 एलएमटी तांदूळ आणि 10.1 एलएमटी गहू विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून खरेदी केला आहे. एकूण 79.75 एलएमटी अन्नधान्याची खरेदी करण्यात आली आहे. या योजनेचा अंदाजे 46,000 कोटी रुपयांचा 100 टक्के आर्थिक भार भारत सरकार स्वतः उचलत आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड, दिल्ली आणि गुजरात या 6 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना गहू वितरीत करण्यात आला आहे आणि उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांदूळ देण्यात आला आहे.

डाळी

पुढील 3 महिन्यांसाठी 5.87 एलएमटी डाळींची आवश्यकता आहे. आतापर्यंत, 3.15 एलएमटी डाळी पाठविण्यात आल्या आहेत, तर 2.26 एलएमटी डाळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पोहोचल्या आहेत आणि 71,738 मे.टन डाळी  वितरित करण्यात आल्या आहेत. 12 मे 2020 पर्यंत 12.75 एलएमटी डाळी (तूर -570 एलएमटी, मूग-1.72 एलएमटी, उडीद-2.44 एलएमटी, चणे-2.42 एलएमटी आणि मसूर-0.4.4 एलएमटी) बफर स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत.

ईसी कायदा

कोविड-19 मुळे वाढती मागणी लक्षात घेता ग्राहक व्यवहार विभागाने आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत फेस मास्क आणि सॅनिटायझर अधिसूचित केले आहे. मास्क, सॅनिटायझर्स आणि त्यांच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या घटकांच्या किंमतींसाठी जास्तीत जास्त दर देखील निश्चित केले आहे. लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवले जाईल याची काळजी घेण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत निर्णय घेण्यासाठी केंद्राने राज्य सरकारांना सर्व अधिकार दिले आहेत.

अन्नधान्य खरेदी

12 मे 2020 पर्यंत एकूण 268.9 एलएमटी गहू (आरएमएस 2020-21) आणि 666.9 एलएमटी तांदूळ (केएमएस 2019-20) खरेदी करण्यात आला आहे.

संपूर्णतः संगणकीकृत

ई-पॉसच्या माध्यमातून एकूण 90 टक्के एफपीएस ऑटोमेशन केले आहे, तर एकूण 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ते 100 टक्के झाले आहे. 90 टक्के शिधापत्रिका आधारसोबत लिंक करण्यात आल्या आहेत, तर 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात हे 100 टक्के झाले आहे.

FCI Food Corporation of India एनएफएसए National Food Security Mission राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भारतीय अन्न महामंडळ एफसीआय food grain अन्नधान्य ओएमएसएस OMSS
English Summary: The FCI has taken various steps to ensure the availability of food grains

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.