ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी यामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत. जरी द्राक्षांचे नुकसान झाले आहेत तरी बेदाणा निर्मिती मधून उत्पन्न पदरी पाडायचे असे शेतकऱ्यांचे मत होते जे की त्याच दिशेने शेतकऱ्यांनी आपली तयारी ही सुरू केली होती मात्र यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यात बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते जे की यासाठी लागणार कच्चा मालाची सुद्धा मोठी किमंत आहे. तसेच पॅकिंग साठी लागणारे साहित्याची आवक बंद असल्याने दोन्ही बाजूने खर्च वाढत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे.
कच्च्या मालाची आयात बंद, वाहतूकीचाही खर्च वाढला :-
बेदाणा निर्मिती करण्यासाठी कच्चा मालाची गरज लागते जसे की डिपिंग ऑइल, कार्बोनेट, गंधक आणि कोरोगेटेड बॉक्स याची आयात बंद असल्याने कच्या मालाची किमतीमध्ये १५ ते २० टक्के नी वाढ झालेली आहे तसेच पॅकिंग साठी जे साहित्य लागते त्या साहित्याच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. हे सर्व मिळून जवळपास २५ टक्के खर्च वाढला असून शेतकरी चिंताजनक परिस्थितीत आहेत. द्राक्षाच्या दर्जा कोसळला असल्याने दर भेटला नाही तर दुसरीकडे बेदाणा निर्मिती साठी शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढे प्रयत्न केले मात्र इकडे सुद्धा अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवरच :-
एक टन बेदाणा तयार करण्यासाठी सुमारे २५ हजार रुपये पर्यंत खर्च येतो मात्र आता या अनेक अडचणी असल्यामुळे प्रति टन बेदाणा तयार करण्यामागे ३ ते ४ हजार रुपये अजून वाढणार आहेत. २५ हजार वरून थेट २८ ते २९ हजार रुपये प्रति टन बेदाणा तयार करण्यासाठी खर्च येणार आहे. या अति खर्चाचा बोझा शेतकऱ्यांवर पडत आहे त्यामुळे शेतकरी हातबल झालेले आहेत. यंदाचे वर्ष द्राक्ष उत्पादकांसाठी केवळ नुकसानीचे वर्ष ठरले आहे.
कडाक्याची थंडी पडल्याने स्वतः शेतकरी शेतात जाऊन शेकोटी करून द्राक्षांना ऊब द्यायचा मात्र अजूनच थंडी वाढल्याने द्राक्षच्या मन्यांना तडे गेले त्यासाठी बेदाणा हा मार्ग निवडला तर त्यात सुद्धा कच्चा माल आवश्यक असतो त्या कच्च्या मालाची किमंत वाढल्याने शेतकऱ्याचे हाल सुरु झाले आहेत. ही संकटांची मालिका संपणे मुश्किल झाले आहे.
Share your comments