दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या जवळ असलेल्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये शेतीमालाचे भाव कमालीचे घसरले आहेत. आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतीमालाला भाव मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील पीक व त्याचा काढणी खर्च परवडत नसल्यामुळे नाममात्र किमतीला विकण्याऐवजी शेतमाल शेत नांगरून शेतातच गाडून टाकत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे की गहू आणि इतर धान्ये प्रमाणे पिकांनाही आधारभूत किंमत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सराई गावातील अजित सिंग या शेतकऱ्याने पिकवलेल्या फ्लॉवरला एक किलो पेक्षा कमी किंमत मिळाली. त्यामुळे संतापलेल्या अजित सिंग यांनी एक एकर च्या शेतातील फ्लॉवरचे पिकावर थेट नांगर फिरवला. अजित सिंग यांनी खत इत्यादींवर जवळजवळ 35 ते 40 हजार रुपये खर्च केले होते. त्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असताना इतका कमी दर मिळाल्याने त्यामुळे ते पीक काढून बाजारात नेण्याचा खर्च परवडण्यासारखा नाही म्हणून त्यांनी त्यावर नांगर चालण्याचा निर्णय घेतला. शेती मला ने भरलेले ट्रक दिली जाऊ शकत नसल्याने शेतमालाच्या किमती पडल्याचे अजित सिंग यांनी सांगितले.
इतर शेतमालाचे ही त्याच प्रकारच्या हाल आहेत. दुसऱ्या एका शेतकऱ्याने 30 किलो फ्लॉवर घाऊक बाजारामध्ये केवळ बावीस रुपयांना विकली. शेतकरी म्हणतात की, सरकार केवळ गव्हाचे पीक घेण्याऐवजी भाज्या पिकवण्याचा सल्ला देतात. मात्र त्यांनी भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केलेले नाही. जर भाज्यांना या आधारभूत किंमत मिळत असते शेतकऱ्यांची निराशा झाली नसती, असे शेतकऱ्यांचे मत आहे. आंदोलनामुळे रस्ते वाहतूक वर अनिष्ट परिणाम झाल्याने शेतमाल वेळेत बाजारपेठेमध्ये पोहोचत नसल्याने त्याचा परिणाम शेतमालाचा पुरवठ्यावर झाला.
Share your comments