सिंखेडराजा तालुक्यांतील किनगाव राजा येथूनच जवळ असलेल्या पांगरी उगले या गावामध्ये आयोग्यारीत्या पाणी पुरवठा कर्मचारी यांनी दि.०४/१०/२०२१ रोजी रितसर राजीनामा दिला होता . सदर ग्रामसेवकानी दुसऱ्या कर्मचाऱ्याची निवड करतांना नियमाप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्य, पदाधिकारी यांना विश्वासात घेवुन रितसर जाहीरात व जाहीरनामा काढुन व त्याची मुलाखत घेऊन कायद्यातील तरतुदीनुसार परिक्षा घेऊन उत्तीर्ण अर्जदाराची निवड करुन त्याचा लिखीत आदेश देऊनच कर्मचाऱ्याची निवड करु शकतो.
मात्र असे कोणतेही नियमात बसणारे बंधन न पाळता रमेश गणपत उगले पाणी राजीनामा स्विकारण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते. पुरवठा कर्मचाऱ्याच्या परंतु सदर ग्रामसेवकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन स्वतःच्या मुलाची निवड करुन वरच्यावर ग्रामपंचायत चा ठराव हा आपल्या कार्यालयात सादर केला होता तो गावातली नागरिकांना अमान्य आहे . या सदर चौकशीसाठी विस्तार अधिकारी बि.डि. घुगे हे गावात आले असता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु ग्रामपंचायतिचे पुर्ण सदस्य हजर नसल्या कारणाने बैठक रद्द करण्यात आली.
त्यानंतर गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली व संतापले गावातील अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले त्यामध्ये गावातील साफसफाई, गावात सांडपाण्याचे नियोजन नसल्याने रस्त्यावर गटारी तुंबल्या आहेत ही सर्व पाहणी विस्ताराधिकारी बि. डी घुगे यांनी केली व ते समोर म्हणाले की गावातील ग्रामपंचायत करते तरी काय? व गावातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची योग्य पद्धतीने नियुक्ती करण्याबाबत पुढील बैठक लावू असेही गावातील लोकांना त्यांनीं सांगितले त्यावेळी ग्रामसेवक पिसे साहेब, गावातील नागरिक रमेश उगले, मनोहर पवार, परसराम उगले, विलास निकाळजे, गजानन निकाळजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास उगले,संजय उगले अक्षय खडसे,
गजानन उगले, शुभम सरकटे, नागोराव उगले, रामविलास उगले, दादाराव साळवे, कैलास उगले, पंढरीनाथ महाराज उगले व गावातील आणि तांड्यातील इतर नागरिक उपस्थीत होते.
Share your comments