भात लागवड जास्त प्रमाणात कोकण किनारपट्टीच्या भागात केली जाते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी भागांमध्ये भात लागवड विक्रमी प्रमाणात होते. यामध्ये जर आपण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी एक लाख हेक्टर क्षेत्रभात शेतीचे आहे.
. यामध्ये मिळणारे दरडोई उत्पन्न वार्षिक एक लाख 25 हजार इतके कमी असल्याने तसेच अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांचे 87 टक्के प्रमाण व इतर होणारे बदल यामुळे उत्पादनात घट होते. या सगळ्या पार्श्वभूमीवररंगीत भात हे एक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.आपल्याला माहित आहेच कि भात हे पीकजास्त पावसाच्या प्रदेशात देखील टिकाव धरू शकते.त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून रंगीत भात लागवडप्रायोगिक तत्वावर केली असून त्याचे बाजारातील आजचे भावकमीत कमी 120 रुपये ते जास्तीत जास्त 350 रुपये प्रति किलो आहे.जर पोषणमूल्यांचा विचार केला तर साध्या भातापेक्षा यामध्ये खूप जास्त पोषक मूल्ये आहेत. विविध आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हा रंगीत भात उपयुक्त आहे.
रंगीत भाताची वैशिष्ट्ये
1- साध्या भातापेक्षा यामध्ये अँटोसायनिन चे प्रमाण खूप जास्त असल्याने व हे एंटीऑक्सीडेंट आहे त्यामुळे माणसाची इम्युनिटी पावर वाढते.
2- रंगीत भात हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे वाढते वजन, मधुमेह, अल्सर व इतर अनेक प्रकारच्या आजारांमध्ये उपयुक्त असून आहारामध्ये समावेश करण्यासाठी अत्यंत योग्य आहे.
3- रंगीत भातामध्ये प्रोटीनचे प्रमाण 4-12टक्के व लोह,पोटॅशियम,मॅग्नेशियम उच्च प्रमाणात आहे.
4- मेद, फॅट आणि साखर यामध्ये नसल्याने वजन घटवण्यासाठी हा भात चांगला असून यासंदर्भात अनेक संशोधन व चाचणी सुरू आहे.
आहारात कसा वापर करावा?
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे हा शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. शिजवण्यापूर्वी त्याला चार तास भिजवून मग कुकर च्या डबल शिट्या देवून शिजवावा. ज्यांना या प्रक्रियेसाठी वेळ नसेल त्यांनी या भाताचे पीठ करून त्यापासून बनवलेल्या भाकरीचा समावेश आहारात केला तरी चालते.
याच्या पिठापासून डोसा, आपे, उत्तप्पा, इडली इत्यादी बनवणे सहज सोपे आहे. तसेच गोड भात, खिचडी, बिर्याणी, खीर, पुलाव, पापड, कुरडयाआणि लाडू बनविण्यासाठी वापरता येतो.सध्या बाजारामध्ये रंगीत भातापासून बनलेले पोहे,मुरमुरे आणि पीठ उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात राबविला गेला प्रयोग
रंगीत भाताचे बियाणे छत्तीसगड राज्यातील आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आत्मा योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण बाबी खाली शेतकऱ्यांपर्यंत दिले गेले. रायगड जिल्ह्यातील उत्तर भागात या भाताचा प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र दक्षिण रायगड मधील तालुक्यांमध्ये रंगीत भाताचे उत्पादन चांगल्या प्रमाणात आले. त्याचप्रमाणे काळे भातापेक्षा लाल भाताचे उत्पादन चांगले दिसून आले. जर मागील हंगामाचा विचार केला तर91 हेक्टर क्षेत्रावर रंगीत भात व काळा भात 93 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला.या हंगामात शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध असल्यामुळे ते वेळेत रंगीत भाताची लागवड करणे शक्य आहे.
त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले असल्याने साधारण 500 एकर क्षेत्रावर रंगीत भाताची लागवड होईल असे नियोजन करण्यात आले आहे.(स्त्रोत-इंडिया दर्पण)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतकऱ्याचा प्रयोग ठरला यशस्वी! लिंबाची शेती केली अन अवघ्या तीन महिन्यात झाले लखपती
नक्की वाचा:एक पाऊल टाका पुढे! ज्वारी पिकवा आणि करा ज्वारीवर प्रक्रिया, कमवा चांगला नफा
Share your comments