राज्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून लोडशेडिंग नसल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहावर ऊर्जामंत्री राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्याच्या विविध भागात लोडशेडिंगबाबत प्रचंड गोंधळ आहे. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही.
भारनियमनाबाबत राज्यात केवळ वाद सुरू आहेत. यावेळी बोलताना ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, राज्यात सध्या कोणतेही लोडशेडिंग नाही आणि राज्यात कुठेही लोडशेडिंग होणार नाही. दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आज सकाळी भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील पूर्णा विश्रामगृहाकडे जात असताना विश्रामगृहातील लाईट गेली. ऊर्जा मंत्र्यांसमोर वीज पुरवठा खंडित झाल्याने दिपनगर प्रशासनाची तारांबळ उडाली.
ओव्हरलोडमुळे संपूर्ण विश्रामगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली. ऊर्जामंत्र्यांसमोरच वीजपुरवठा खंडित झाला. राज्यात मागील काही दिवसापासून भारनियमन चालू होते पण आता भारनियमन नाही अस राऊत म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या शाब्दिक वादाबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारले असता त्यांनी हा मुद्दा बाजूला सारला. याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचा रास्त प्रश्न! कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 15 ते 18 रुपये असताना शेतकरी 10 ते 12 रुपये प्रति किलोने कांदा का विकणार?
Share your comments