पुणे तिथे काय उणे असे अनेकदा म्हटले जाते. पुण्यात कधी कोण काय बोलेल याची अंदाज कोणीही लावू शकत नाही. पुण्यातील घोषणा आणि बोलण्याची पध्दतच निराळी आहे. आता अशाच एका फ्लेक्सची राज्यात चर्चा रंगली आहे. हा फ्लेक्स एक राजकीय असून सध्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. याचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि सर्वच पक्षातील दिग्गजांनी आपापल्या परीने राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी नव्या नव्या आयडीया शोधायला सुरुवात केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी 'जिथे गरज तिथे धीरज' अशा आशयाचा फ्लेक्स चाैकात लावला आहे. कसलीही मदत हवी असल्यास फोन करण्याचे आवाहन त्यांनी त्यात केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे. असे असताना आता त्यांच्या या फ्लेक्सखाली दोन छोटे फ्लेक्स लावत 'धीरज आम्हाला नाही तुझी गरज' आणि 'नको बापट नको टिळक पुण्याला पाहिजे नवी ओळख', प्रभागातील मतदार.. असे म्हटल्याने सध्या याची चर्चा रंगली आहे. यामुळे पुण्यात आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे.
याची शहरात चर्चा असताना आता मनसेने यामध्ये उडी घेतली आहे. मनसेच्या साै. नलिनी व योगेश आढाव यांनी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या छायाचित्रांसह एक मोठा फ्लेक्स लावत नागरिकांचे लक्ष वेधले आहे. यामुळे मनसे देखील यामध्ये मागे राहिली नाही. यामध्ये त्यांनी उठा उठा निवडणूक आली. गाजराची शेती लावण्याची वेळ झाली! असे म्हणत आता वेधले आहे. यामुळे आता नेमके कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे यामुळे नागरिक संभ्रमात आहेत.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. यामुळे पुण्यात अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरे देखील वाढले आहेत. पुण्यात सध्या भाजपची सत्ता असून आता ही सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी तयारी केली असून राज्यात देखील त्यांची सत्ता असल्याने आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे पुण्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
Share your comments