1. बातम्या

मधमाशांच्या गायब होण्याने अन्नपिकांच्या उत्पादनावर होणार परिणाम

KJ Staff
KJ Staff


पुणे : जगातून मधमाशांचे कमी होत जाणारे प्रमाण मानवजातीसाठी घटक ठरणार आहे. मधमाशांचे कमी होण्याने  अन्नपिकांचे उत्पादन कमी होणार असल्याचा दावा अमेरिकास्थित रॉयल सोसायटी संशोधन संस्थेने केला आहे. त्याबाबतचे वृत्त ब्रिटनमधील द गार्डियन या वर्तमानपत्राने दिले आहे.या वृत्तनासार, पर्यावरणशास्त्रज्ञ रॅशेल विनफ्री या म्हणतात कि, ज्या पिकांवर जास्त मधमाशा येतात, त्याचे अधिक उत्पादन होते. मला नव्हत वाटलं कि मधमाशा कमी झाल्या कि त्याचा इतका परिणाम  होऊ शकेल.

या अभ्यासाच्या माध्यमातून अमेरिकेतील १३ राज्यांतील सात  पिकांचा अभ्यास केला गेला. त्यासाठी १३० शेते निवडली गेली.  यामध्ये सर्वात जास्त फटका सफरचंद आणि चेरी यांना बसला आहे.मधमाशांच्या बम्बलबीझ सारख्या जंगली जाती आपला अधिवास ( कार्यक्षेत्र) गमावत आहेत. त्यांची संख्या विषारी कीडनाशके आणि  बदलत्या तापमानामुळे कमी होत आहे. ही धोक्याची घंटा आहे.

जंगली मधमाशा या  मोठ्या प्रमाणावर परागीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. जंगली मधमाशा हे पाळीव मधमाशांपेक्षा अधिक प्रभावकारी असतात. परंतु त्याची संख्या सातत्याने कमी कमी होत आहे.  अमेरिका हे राष्ट्र मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे उतपादन करते. तिकडे मोठ्या प्रमाणावर खतांचा आणि कीडनाशके आणि कीटकनाशके यांचा वापर होतो. अमेरिकेनंतर अनेक देश उत्पादनवाढीसाठी याचा मार्गाचा अवलंब करतात. तसेच पारंपरिक बहुपीक पद्धती या रेट्यामुळे मागे पडली आहे, त्याचा परिणामदेखील मधमाशांचा संख्येवर झाला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters