सोमिनाथ घोळवे
छोटे शेतकरी, भूमिहीन, अल्पभूधारक, रोजंदारी करणाऱ्या कुटुंबावर-वर्गावर दुष्काळी स्थितीचे हळूहळू परिमाण दिसू लागले आहेत. या परिणामाची नोंद घेणे आवश्यक आहे. उदा. वार्षिक कालखंड पकडला तर या वर्गातील कुटुंबाजवळ "पैशांची बचत" किती असेल?. जवळजवळ 75 ते 80 टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे ही छोटी-छोटी कर्ज घेऊन कर्जबाजारी झालेली दिसून येतात. दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन घटल्याने या कुटुंबाकडे घेतलेली सावकारी कर्ज, खते-बियाणे दुकानदारांच्या उदारी आणि मायक्रो फायनान्स चे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आता पैसे नाहीत. हे कर्ज कसे वापस करणार हा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे.
या कुटुंबाकडे 15 ते 20 हजाराची बचत निर्माण होण्यासाठी किमान 5 ते 6 वर्ष लागतात. पण अलीकच्या काही वर्षांत महागाईच्या तुलनेत कुटुंबाचे उत्पन्न वाढले नाही. परिणामाची कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतील ऐवढे वार्षिक उत्पन्न राहिले नाही. त्यात प्रत्येक महिन्याला महागाईचा आकडेवारी चढत्या क्रमाने आहे.
परिणामी "बचत" नावाची कल्पना तळागाळातील वर्गापासून खूपच दूर झाली आहे. दुसरे असे की, कुटुंबे सरकारने कोणतीही मदत जाहीर केली तरीही अत्यल्प लाभार्थी असतात. किंवा मदतीपासून वंचित राहतात. उदा. शेतीच्या अनुदानाचा लाभ अल्पभूधारक कुटुंबाला किती मिळत असेल?. चार-दोन हजाराच्या पुढे जात नाही. भूमिहीन, शेतमजूर आणि ठोक्याने शेती करतात, त्यांना तर लाभ मिळत नाही.
तळागाळातील कुटुंबे दुष्काळी स्थितीत केवळ मनरेगाचे लाभार्थी नावापुरते असतात. पैसे दुरीकडेच जातात. या शिवाय टँकरने आलेले पाणी केवळ मिळते. अर्थात फारसे लाभार्थी ठरत नाहीत. परिणामी या तळागाळातील कुटुंबाला श्रम-अंगमेहनत हाच एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असतो. दुष्काळात याचीच उणीव निर्माण होते. परिणामी कुटुंबाची उपजीविका भागवणे कठीण होऊन जाते. "पैशांची बचत" होणे यांच्या जीवनातून निघून गेलेले दिसून येते.
कारण कर्जबाजारी चक्रव्यूहात अडकलेली असतात. एकंदर दुष्काळ आला की या तळागाळातील कुटुंबाची होरफळ ठरलेली असते. पण अलीकडे मात्र महागाई वाढीच्या दराने अगोदरच होरफळ चालू आहे, त्यात चालू वर्षी दुष्काळ आहे. या वर्गावर काय परिणाम होतील हे आताच सांगणे आवगड आहे.
Share your comments