महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये सुरुवातीला केवळ जालना आणि बीड मध्ये रेशीम शेती केली जात होती. खरेदी केंद्राच्या माध्यमातून जालना आणि बीड ला शासनाने बाजारपेठ उपलब्ध केली होती मात्र रेशीम कोषाची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात सुविधा नव्हती त्यास थेट कर्नाटकला पाठवावे लागत होते. परंतु आता जालन्यातील खरेदी केंद्रावरच रेशीम गुणवत्ता चाचणी सुरु होणार असल्याची माहिती रेशीम विभागाने दिली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तसेच रेशीमचा दर्जा कळण्यास मदत होईल असे रेशीम विभागाने सांगितले आहे. रेशीम शेती वाढवण्यासाठी शासनाकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे कृषी विभागाने दिलेले योगदान पाहता मराठवाड्यामध्ये रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. जालना जिल्ह्यामध्ये एप्रिल २०१८ मध्ये येथे पहिले रेशीम उपकेंद्र सुरु करण्यात आले होते.
तुती लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असे रेशीम उद्योग विभागाने म्हटले आहे. १५ हजार ५५० शेतकऱ्यांकडून १ हजार ३५० टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले असून खरेदीसाठी राज्यभरातून तसेच कर्नाटकातून देखील व्यापारी येथे येत असतात. आता रेशीम कोष दर्जाची चाचणी येथेच होणार असल्याने, चांगला दर देखील मिळेल.
रेशीम कोशाची किंमत ही त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. कोशाचे नमुने हे खरेदी केंद्रावर पाठवले जाऊन परीक्षणासाठी ठेवले जातात, यावेळी अळी किती दिवसांनी बाहेर पडते याचे परीक्षण केले जाते. किती उच्च प्रतीचा धागा निघेल याचे परीक्षण केले जाते. गुणवत्तेच्या आधारावर शेतकऱ्यांना उत्पादित रेशीमची किंमत ठरवणे सोपे जाते. रेशीम शेतीच्या अनुषंगाने रेशीम उत्पादकास जालना ही एक हक्काची बाजारपेठ मिळाली असुन येथे रेशीमला योग्य दर मिळत आहे.
येथील रेशीमची वाढती बाजारपेठ पाहता विविध सोई सुविधा तसेच बाजारपेठेचा विकास करण्यासाठी रेशीम, विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. उच्च गुणवत्ता असलेल्या रेशीम उत्पादनामध्ये जालना जिल्ह्याचा मोठा वाट आहे. व येथील बाजारपेठ वाढत आहे त्यामुळे विदर्भ, खान्देश, ठाणे, तसेच अहमदनगर येथील रेशीम उत्पादक जालना बाजारपेठस प्राधान्य देत आहेत. त्यामुळे जालना येथे गुणवत्ता तपासली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
कौतुकास्पद कामगिरी! या जिल्हा बँकेने केवळ तीनच आठवड्यात 561 कोटीची पीककर्ज प्रकरणे केली मंजूर
पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील, राजू शेट्टींचा गडकरींना टोला
Share your comments