सध्या सर्वजण पावसाची वाट बघत आहेत. यंदा मात्र पाऊस उशिरा दाखल होत असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जूनचा अर्धा महिना संपत आला आहे. तरीही जिल्ह्यात पावसास फारशी सुरुवात झालेली नाही.
यामध्ये पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुण्यात मोठ्या प्रमाणावर धरण आहेत. जिल्ह्यात लहान मोठी एकूण २६ धरणे आहेत. या धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना होतो.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. यामुळे आता ही धरणे तळाला गेली आहेत.
आता शुगर फ्री तांदूळ विकसित होणार, शास्त्रज्ञांचे काम सुरू
येत्या काळात पाऊस न झाल्यास या धरणातील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा १९.१५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
लंपी रोगामुळे पांगरा येथे अनेक जनावरे दगावली,शासकीय पशुसंवर्धन खात्याच्या डाॅक्टरांचे दूर्लक्ष
दरम्यान, सध्या खडकवासला धरणातून डाव्या कालव्याला २६५ क्युसेक, तर उजव्या कालव्याला १०५४ क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. वीर धरणातून डाव्या कालव्याला ८२७, तर उजव्या कालव्याला १५५० क्युसेकने आवर्तन सुरू आहे.
पट्ट्याने थार गाडीने नांगरने वावर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..
राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना 1500 कोटींच्या मदतीची घोषणा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देणार..
८५० रुपयांची कापसाची बॅग तब्बल 2300 रुपयांना, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आला समोर...
Share your comments