मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाची उपलब्धता अधिक असल्याने ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या साखर वर्ष २०२१ च्या दरम्यान देशातील साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देशाच्या एकूण ऊस उत्पादनापैकी १९.३९ टक्के ऊसाचे उत्पादन राज्यात होत असते. यावेळी ऊस अधिक प्रमाणात असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ होणार असून हे उत्पादन साधरण १२ टक्क्यांनी वाढून ३.०५ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशातील साखरेचे मागच्या वर्षीच्या तुलनेत १२% ने वाढून ३.०५ कोटी टन होईल असा अंदाज इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी अर्थात आयसीआरएने आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
आयसीआरएने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे कि, भारतातील साखर उत्पादन १२.१ % ने वाढून ३०.०५ दश लक्ष. होण्याचा अंदाज आहे. इथेनॉल ,मळी आणि उसाच्या रसासाठी जाणारा ऊस याचा होणार परिणाम लक्षात घेतला तरी यावर्षी साखरेच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. या वाढीचे सर्वात महत्वाचे कारण महाराष्ट्र आज कर्नाटकमध्ये वाढलेलं क्षेत्र आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे उत्पादनावर प्रभाव पडला होता. इक्राने २.५ कोटी टनाची खपत आणि ५० ते ५५ लाख टनाच्या निर्यातीवर विचार केल्यानंतर साखर वर्ष २०२० मध्ये शिल्लक साठा १.१- १.१५ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. यासह साखर वर्, २०२१ मध्ये साखर उत्पादनामुळे देशातील साखरेची उपलब्धता साधरण ४.२ कोटी राहण्याची शक्यता आहे.
देशातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात २०२०-२१ या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ८% ने वाढ झाल्याचे ऊस कारखानदारांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन शुगर मिल्स अससोसिएशनने मागच्या आठवड्यात म्हटले होते. मागच्या हंगामात ४८.४१ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. ती यावर्षी ८% ने वाढून ५२.२५ लाख हेक्टर झाले आहे. या वाढीव क्षेत्रामुळे यावर्षी साखरेच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ऊस लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यांमुळं वाढलं आहे हे संस्थेच्या अभ्यासातून पुढे आलेलं आहे. मागच्या वर्षी या दिनही राज्यात दुष्कळजन्य परिस्थिती असल्यामुळे लागवडीचे क्षेत्र कमी झाले होते.
Share your comments