राज्यातील शेतकरी आणि शेतीकडे वाळलेले उदयन्मुख शेतकरी तसेच निर्यातदार यांना दिशा दायक ठरणारे देशातील पहिले कृषी व शेतीमाल निर्यात माहिती केंद् दिनांक 15 मे रोजी पुण्यात सुरू करण्यात आले.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात ही मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा महत्वकांशी उपक्रम सुरू करण्यात आला. नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी. आर चिंता ला यांनी व्हिसी द्वारे या उपक्रमाचे उद्घाटन केले.
मुख्य म्हणजे या उपक्रमाची मुख्य संकल्पनाही कृषी व कृषी व्यवसाय समितीचे अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी यांची असून ते सातत्याने गेल्या बर्याच दिवसांपासून या उपक्रमावर सातत्याने काम करीत आहेत. एम सी सी आय ए च्या माध्यमातून हे केंद्र महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील निर्यातदारांसाठी वन स्टॉप शॉप या धर्तीवर काम करणार आहे.
या निर्यातीच्या क्षेत्रामध्ये जे नवोदित निर्यातदार येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे केंद्र विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश असेल जसे की, कीडनाशकांचे उर्वरित अंशाचे व्यवस्थापन, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, विविध आयातदार देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालासाठी गुणवत्तेचे कोणते निकष लावले जात आहेत या विषयाची तपशीलवार माहिती दिली जाईल.
तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान, निर्यातक्षम फळबागांचे व्यवस्थापन, काढणी पद्धती, निर्यात केल्या जाणाऱ्या मालाची गुणवत्तेची नियमावली, पॅकेजिंग, विविध देशांना हवाई किंवा सागरीमार्गे शेतीमाल निर्यात पाठवण्याची निकष, हरितगृहातील उत्पादन इत्यादी निर्याती संबंधी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर या निर्यात केंद्रातून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
Share your comments