शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिवेशानात विविध विषसांवर चर्चा करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमिवर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा करणार आहे असे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात 26 नोव्हेंबर पासून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, केळी, कांदा, आणि द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा आणि बटाटा पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमधील वेचणीला आलेला कापूस पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यालातील फळबागांना गारपिटीचा फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पंचनामे करणाचे आदेश प्रशासनाला दिले होते.
हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केले होते. आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुक्रवारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
Share your comments