आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेती व्यवसायात अनेक छोटे मोठे अमुलाग्र बदल घडून आले आहेत. जास्त उत्पन मिळणाऱ्या आणि कमी वेळात जास्त फायदा मिळवून देणाऱ्याच पिकांची लागवड शेतकरी वर्ग करत आहे त्यामुळे पीक पद्धती मध्ये सुद्धा मोठे बदल घडून आले आहेत.सध्या राज्यातील अनेक भागात नवनवीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामध्ये राजमा, आणि करडई यांचा मुख्य समावेश आहे. तसेच राज्यातील काही भागांत करडई चे लागवडी खालील क्षेत्र वाढतच चालले आहे. या मागे सुद्धा अनेक कारणे आहेत.
शेतकरी वर्ग करडईची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे:
करडई मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे असतात शिवाय करडई ला बाजारात मोठी मागणी असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्यातील करडई लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. शिवाय करडई पासून चांगले उत्पन्न सुद्धा मिलत आहे आणि भाव सुद्धा चांगला मिळत असल्याने शेतकरी वर्ग करडई ची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहे.राज्यात सुरवातीच्या काळात सोयाबीन चे क्षेत्र जास्त असायचे परंतु कोरोनाच्या काळात लोकांना करडई आपल्या आरोग्यास किती फायदेशीर आहे हे समजल्यावर वाशीम जिल्ह्यात परत एकदा करडई चे लागवडी खालील क्षेत्र वाढू लागले. तसेच कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेक लोक गावी परतले आणि शेती करू लागले. आपल्याला आपल्याच शेतीमधून पोषक खायला मिळणार असल्याने अनेक लोकांनी आपल्या रानात करडई चे उत्पन्न घेतले आहे.
रब्बी हंगामात 720 हेक्टर क्षेत्रावर करडई लागवड:-
यंदा च्या वर्षी रब्बी हंगामात वाशीम जिल्ह्यात 720 हेक्टर क्षेत्रावर करडई ची लागवड शेतकरी वर्गाने केली होती. आणि आता दिवसेंदिवस हे क्षेत्र लागवडीखालील वाढतच चालले आहे. कारण बाजारात करडई ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच योग्य तो हमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग करडई लागवडीला पसंती देत आहेत. या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती अभियाना अंतर्गत करडई लागवडीसाठी वाशीम जिल्हयातील ६०५ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आपली नोंद ओढली आहे. तसेच करडई हे पीक संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे म्हणून करडई वाचवण्यासाठी शासन सुद्धा खूप प्रयत्न करत आहे. करडई लागवडीसाठी खर्च हा अत्यंत कमी येतो आणि त्यामधून बक्कळ फायदा सुद्धा मिळत असल्यामुळे पुढच्या वर्षी वाशीम जिल्ह्यातील करडई लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फायदेशीर आणि मुबलक पोषकद्रव्ये असणारी करडई:-
करडई मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक द्रव्ये असतात शिवाय ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्यामुळे शेतकरी वर्गाने करडई लागवडीवर भर दिला आहे. करडई लागवडीखाली खर्च सुद्धा खूप येतो शिवाय यामधून मुबलक फायदा मिळत असल्याने शेतकरी वर्ग करडई लागवड करू लागला आहे. शिवाय करडई च्या बियांपासून तेलनिर्मिती सुद्धा केली जाते त्यामुळे बाजारात सुद्धा करडई ला मोठी मागणी आहे.
Share your comments