किटकनाशक वापरातील आणि हाताळनितील गंभीर चुका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने देशातील जवळजवळ तीन लाख कीटकनाशक विक्रेत्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम व तसा प्रकारचा अभ्यासक्रम देशभर सुरू केला आहे. यात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षणाची पहिली तुकडी ही महाराष्ट्रातील बीड जिल्हातून आहे.
कीटकनाशकांमुळे एकूणच परिसंस्थेवर तसेच मानवी आणि प्राणी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात. हे परिणाम लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने त्या संबंधीचा एक सखोल अभ्यास सुरू केला होता. क्या अभ्यासावरून निदर्शनास आले की, देशात जवळजवळ लाखो विक्रेते केवळ अनुभव आणि माहितीच्या आधारावर या व्यवसायात काम करीत होते. बऱ्याच विक्रेत्यांकडे त्यासंबंधीच्या ज्ञान किंवा शिक्षण नसल्याचे केंद्राला आढळले होते.
कीटकनाशकांची विक्री, साठवणूक करणारी व्यक्ती ही कमीत कमी पदवीधर असावी, अशी अट केंद्र सरकारने लागू केली आहे. तसंच प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र, कृषिशास्त्र यापैकी एक पदवी या व्यवसायात येणाऱ्यांसाठी बंधनकारक केली आहे. मात्र सरकारचे वरील प्रकारच्या अटींमुळे जुनी विक्रेते अडचणीत आल्याने ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर असोसिएशन ने कृषी मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा केला.
त्यामुळे केंद्राने याबाबतीत एक वर्षाचा नवीन पदविका अभ्यासक्रम आणून त्यासाठी कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी सात हजार 600 रुपये शुल्क भरून राज्यातील जवळजवळ पंचवीस हजार विक्रेते बारा आठवड्यांच्या या अभ्यासक्रमाचा लाभ घेणार आहेत.
Share your comments