मोदी सरकारने जुलैसाठी देशातील साखर कारखान्यांना वाढीव साखर कोटा दिला आहे. जुलैसाठी २४ लाख टन साखर विक्री कोटा देशातील ५६१ कारखान्यांना केंद्राने दिला. साखर कोटा वाढल्याने विक्रीचा दबाव कारखान्यांवर येण्याची दाट शक्यता आहे.
देशात पावसाळ्याचा हंगाम काही प्रमाणात सुरू होण्यास अवधी लागत असल्याने मागणी थोड्या प्रमाणात तरी आहे. यामुळे सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. हे दर येणाऱ्या काळात बदलणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत हा कोटा तब्बल अडीच लाख टनांनी अधिक आहे. तर जूनच्या तुलनेतही ५० हजार टनांनी साखर कोटा अधिक आहे. यामुळे हा आकडा मोठा आहे.
जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
जूनच्या पहिल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलला ५० ते ७० रुपयांची वाढ होती. ही वाढ फारशी आश्वासक नसली तरी साखरेची मागणी थोड्या प्रमाणात होती. जुलैमध्ये साखरेची मागणी कितपत राहील याबाबत साखर उद्योगातून साशंकता व्यक्त होत आहे.
अनेक कारखाने जूनमधील आपला कोटा लवकरच विक्री करण्याच्या मानसिकतेत आहेत. आता बरीच भर म्हणून केंद्रानेही जुलैच्या साखर कोट्यात वाढ केली आहे.
अभिमानास्पद ! IFAJ मध्ये भारताचा 61 वा सदस्य देश म्हणून समावेश
जुलैमध्ये अनेक धार्मिक उत्सव सुरू असल्याने साखरेला मागणी वाढेल. असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये अशा मानसिकतेत केंद्र सरकार आहे.
शेळीच्या दुधापासून खवा, पनीर, चीज, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..
समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
Share your comments