काही दिवसांपूर्वी दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन केले होते. यामुळे मोदी सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले होते. यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले होते. असे असताना आता शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. हे आंदोलन मागे घेताना मात्र मोदी सरकारने त्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. यामुळे शेतकरी नाराज झाले असून त्यांनी काल विश्वासघात दिवस साजरा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय किसान युनियनने सोमवारी ठिकठिकाणी धरणे देऊन विश्वासघात दिवस साजरा केला. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर समिती स्थापन करून शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.
असे असताना मात्र त्यानंतर समितीही स्थापन केली नाही आणि गुन्हेही मागे घेतलेले नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनावेळी अनेक शेतकऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच एमएसपीवर समिती स्थापन करण्याचे आश्वासन आणि चर्चा पूर्ण झालेली नाही. हे सर्व मुद्दे या निवडणुकीतून गायब झाले, असे म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे हे आंदोलन पुढे पेटण्याची शक्यता आहे.
सरकार एमएसपीबद्दल बोलत नसल्याने लोक त्यांच्यावर निवडणुकीच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतील. अनेक ठिकाणी भाजपच्या लोकांना गावातून पळावे लागत आहे. भाजपच्या सर्वच मंत्र्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार निवडणूक प्रचार सुरू केला असला तरी, त्यांच्या भाषणात जिना आणि मुघलांचाच अधिक उल्लेख होतो. शेतकऱ्यांच्या एमएसपीचा मुद्दा गायब आहे. असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. यामुळे आता पुढील रणनीती ठरवावी लागेल, असा सुचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यूपी विधानसभा निवडणुकीतून शिक्षण, रोजगार, शेती हे मुद्दे गायब झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतीय किसान युनियनचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे या निवडणुकीत काय परिणाम होणार का हे लवकरच समजेल. शेतकरी नेत्यांनी कोणाला पाठींबा दिला नसला तरी त्यांचा भाजपला विरोध दिसून येत आहे. यामुळे याचा भाजपला फटका बसणार हे मात्र खरे आहे. दिल्लीतील या आंदोलनात अनेक शेतकरी हे उत्तर प्रदेश आणि पंजाब येथील असल्याने आता या निवडणुकीत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
Share your comments