शेतीत सध्या ट्रॅक्टर युग सुरु असलं तरी प्रत्येक काम ट्रॅक्टरने होत नाही, आणि प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर अजूनही परवडत नाही. यासाठी आजही सर्जाराजाची साथ शेतकऱ्याला आहे. शेतकरी आजही आपल्याकडे बैलजोडी ठेवतात.
बैलजोडीची किंमतही आता काही कमी राहिलेली नाही. तसेच सर्जाराजाची देखरेखही सोपी नाही, या कामात शेतकऱ्याला सुटी नाही, पण शेतकऱ्याची सर्जाराजाला आणि त्याची आपल्या मालकाला साथ कायम आहे, या सर्जाराजासमोर त्याला कारही फिकी वाटते.
महाराष्ट्रात असाच सर्जाराजाच्या जोडीचा व्यवहार झाला, शेतकऱ्याने ही बैलजोड साध्या कारच्या किंमतीत घेतली आहे. चक्क कारच्या किंमतीत एका शेतकऱ्याने बैलजोडीखरेदी केल्याची घटना नाशिकच्या नामपूर बाजारात घडली आहे.
शेतकऱ्याने चक्क साडेपाच लाख रुपयांना खिलार जातीची बैलजोडी खरेदी केली आहे. सध्या याचीच चर्चा सगळीकडे सुरू आहे. राजूबाबा सूर्यवंशी असे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथील शेतकऱ्याचं नाव आहे.
या बैलजोडीची गावातून बँडच्या सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शेतीसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे बैल. खिलार जातीच्या बैलांना बाजारात मोठी मागणी असते.
अनेक शेतकरी हौस म्हणून शेतीसह शर्यतीसाठी देखील खिलारी बैलांची खरेदी करतात. नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथील एका शेतकऱ्याने चक्क नामपूर बाजार समितीमधून ५ लाख ५१ हजार रुपयांना खिलारी बैलांची जोड खरेदी केली आहे.
या बैलजोडीची गावातून बँडच्या लावून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. घरोघरी या बैलजोडीचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले.
दरवर्षी एकादशीला काढण्यात येणाऱ्या मुंजवाड ते बेज पायी दिंडीतील रथासाठी ही बैलजोडी खरेदी करण्यात आली. देवाच्या कामाला ही बैलजोडी असल्याने त्यांची किंमत करायची नाही म्हणून सांगितल्या किंमतीला ही बैल खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
बैलाची जोडी खरेदी करणाऱ्या राजूबाबा सूर्यवंशी यांनी सांगितले की, पायी दिंडीतील रथासाठी बैलांची जोडी खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळं या बैलांची किंमत करायची नाही. सांगेल त्या किंमतीला बैलांची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
स्वामीनाथन आयोगाचा अहवाल नेमका कसा आहे? शेतकऱ्यांना बळ मिळेल का? जाणून घ्या सविस्तर..
Share your comments