1. बातम्या

अपहरणकर्ताल्या पकडण्यासाठी धाडसी शेतकऱ्याने उभा फड पेटवला; आरोपी जेलबंद

ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्यात आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात (Sugarcane Farm) लपला होता.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे

ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्यात आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली. ऊस तोड कामगाराच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ऊसाच्या फडात (Sugarcane Farm) लपला होता.

अपहरणकर्ताल्या पकडण्यासाठी धाडसी शेतकऱ्याने उभा फड पेटवला. यांनतर आरोपीला पकडण्यात आले. अपहरणकर्ताल्या पकडण्यासाठी फडाला आग लावरणाऱ्या धाडशी शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब दुबिले आहे. विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; आता तुमचे पैसे होणार दुप्पट, असा घ्या लाभ

मोठी बातमी : ७/१२ उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब; सरकारचा मोठा निर्णय

मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास आरोपीने ऊसतोड कामगारांच्या गाडीत झोपलेल्या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, पण मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ऊसतोड कामगार गाडीकडे धावले. त्यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपीने धूम ठोकली आणि तो ऊसाच्या फडात धाव पळाला.

तेव्हा ऊस मालक बाबासाहेब दुबिले यांनी अख्ख्या ऊसाच्या फडला आग लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अपहरण करणारा आरोपी अलगद जाळ्यात सापडला. विष्णू उत्तम गायकवाड असं लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ऊसतोड कामगारांनी आरोपीचे हातपाय बांधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा : PM Kisan Yojana : 'या' गोष्ट पूर्ण करा; नाहीतर मिळणार नाहीत पंतप्रधान सन्मान निधीचे 2000 रुपये

English Summary: The brave farmer set fire to catch the kidnappers Published on: 23 February 2022, 12:14 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters