शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांमुळे भरपूर प्रमाणात नुकसान होते. त्यातल्या त्यात रानडुक्कर म्हटली म्हणजे विचारायचे कामचनाही. रानडुकरा मुळे बरेच पिके जमीनदोस्त होतात. रानडुकरांच्या नुकसानीचे प्रमाण जास्त असतं.अशाच या नुकसानदायक रान डुकरांना पळवण्यासाठी एका शेतकऱ्याने अनोखा प्रयोग केला आहे त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
रानडुकरांना पळवण्यासाठी अजब जुगाड
तुमसर तालुक्यातील पवणारा परिसरात सध्या रानडुकरांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढला असून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. या त्रासामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचे नाकीनऊ आले आहेत. रानडुकरांची कळपाचे कळप पिकामध्ये शिरतात आणि पूर्ण पीक उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पवणारा येथील शेतकऱ्याने एक उपाय शोधून काढला आहे. त्यांनी सुतळीच्या पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्या मिरचीवर जळालेलाऑइल घालून लोखंडी सळाखीलागुंडाळून बांधून दिले.
संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतावरील धुर्यावर ते उभे करून आग लावली. त्यामुळे त्या पासून बनणाऱ्या धुरात ऑइल ची दुर्गंधी व मिरच्या मुळे रान डुकरांना खेसखेसीहोईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही आणि झालेही तसेच शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
रानडुकरे हे जास्त संवेदनशील असल्यामुळे रानडुक्कर लांबूनच वासावरून कोणते पीक कोणत्या शेतात आहेहे ओळखतो व तेथे जाऊन पिकांची नासाडी करतो.या दुर्गंधी व खेडखेसीमुळेरानडुक्कर येणार नाही असे त्याचे मत आहे.हा प्रयोग चार दिवसांच्या अंतराने करावा असेही त्यांनी सांगितले. या प्रयोगावर आजूबाजूचे शेतकरी लक्ष देऊन आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर शेतकरी आपल्या शेतात करणार असल्याचे सांगण्यात आले.
आता अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापणी वर आहे. घातक रान डुक्कर नासाडी करतात. झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली तर वनविभागाकडून तुटपुंजी मदत मिळते. त्याकरता हे विविध प्रकारचे कागदपत्रे व खर्च करावा लागतो. त्यापेक्षा वनविभागाकडे नुकसानभरपाई न मागितलेली बरी असे बऱ्याच शेतकऱ्याचे मत आहे. ( स्त्रोत- लोकमत)
Share your comments