आपल्या देशात भुसार धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका,तांदूळ यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. कारण या भुसार पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात होत असतो. सध्या सर्व जगभर महागाई ने सर्व सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत करून टाकले आहे. यंदा च्या रब्बी हंगामात आपल्या देशात गव्हाचे विक्रमी उतपादन निघाले होते परंतु जागतिक पातळीवर गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे गव्हाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
भारतीय गव्हाला प्रचंड प्रमाणात मागणी:
भारतीय केंद्रीय सरकारने गव्हाची निर्यातीवर बंदी घातलेली आहे. हा निर्णय घेण्यामागे सुद्धा केंद्र सरकारचा एक उद्देश होता तो म्हणजे वाढत्या गव्हाचे भाव नियंत्रित राहावे यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजार आणि जागतिक पातळीवर भारतीय गव्हाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे.तसेच यंदाच्या वर्षी निर्यातीमधून अधिकचा उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच वाढत्या गव्हाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर पुर्णपणे बंदी घातलेली आहे. याचा परिणाम आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि जागतिक पातळीवर सुद्धा दिसून येणार आहे.
गहू उत्पादनात गहू दुय्यम स्थानी:-
गहू उत्पादनात आपला भारत देश जगात दुय्यम स्थानी आहे शिवाय यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. सध्या महागाई आणि रशिया युक्रेन च्या युद्धामुळे जागतिक पातळीवर गव्हाला प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे मागणी वाढल्याने भावात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यंदाच्या आर्थिक वर्ष्यात भारताने 70 लाख टनाची गव्हाची निर्यात केली आहे.
केंद्र सरकारकडून अधिकच्या सूचना:-
केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यात बंदी वरून काही अधिकच्या सूचना जारी केल्या आहेत. ज्या दिवसासाठी लेटर ऑफ क्रेडिट असेल त्याच दिवशी गव्हाची निर्यात केली जाणार आहे. या निर्णयामागे एकच कारण आहे ते म्हणजे महागाई. तसेच जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाल्यामुळे तसेच उत्पादनात घट झाल्यामुळे गव्हाची मागणी वाढली आहे आणि भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
Share your comments