केळी हे पीक बारमाही घेतले जाते जे की सर्व भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु खानदेशात केळीच्या उत्पादनात घट झालेली आहे आणि एखाद्या पिकाच्या बाबतीत आवक घटली तर दरावर सुद्धा परिणाम होतात मात्र केळीच्या बाबतीत असे घडले नाही. खानदेशात सध्या जवळपास १७५ ट्रक ने १६ टन केळीची आवक केली असून तिथे केळी ला प्रति क्विंटल ४०० ते ७०० रुपये प्रमाणे दर मिळत आहे. वातावरणाचा परिणाम तर उत्पादनावर झाला होता मात्र याची भरपाई दरातून होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी केला होता. सध्या दर्जदार केळी ची काढणी चालू आहे मात्र दरामध्ये कोणतीही वाढ झाली नाही त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
काय आहेत कारणे ?
वातावरणातील बदलाचा परिणाम केळी वर झाला आहेच, त्याचबरोबर करपा रोगाचा प्रादुर्भाव ही केळीवर झाला आहे. अवकाळी पाऊसाचे पाणी केळीच्या बागांमध्ये साचून राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे केळीच्या बागेचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी बागा मोडल्या तर काही शेतकऱ्यांनी योग्य भाव भेटेल अशा आशेने ठेवल्या मात्र दर ही पडल्याने हाती काहीच पडले नाही. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी केळीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे बाजारात केळीची मागणी ही कमी झाली आहे. भविष्यात केळीचे दर वाढतील असे सांगितले तर आहे मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होईल की व्यापाऱ्यांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केळीच्या दर्जानुसार मिळतोय दर :-
केळीच्या दर्जा वर त्याचा दर अवलंबून असतो. यंदा तर संकटांची मालिका सुरू असल्याने याचा परिणाम उत्पादनावर झाला आहेच तसेच मालावर सुद्धा झालेला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन तसवच तूर पिकांना सुद्धा दर्जाप्रमाणेच भाव मिळाला आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या केळीला ७०० रुपये भाव मिळाला आहे तर कमी दर्जाच्या केळीला २५० रुपये भाव मिळाला आहे.
तापमानात वाढ झाल्यावरच दरात होणार सुधारणा :-
यंदा वाढत्या थंडीमुळे बाजारपेठेत केळीला मागणी कमी आहे. दरवर्षी अशाच प्रकारे परिस्थिती असते मात्र यावर्षी उत्पादनातही घट झाली आहे तसेच नुकसान ही झाले असल्यामुळे अधिक तीव्रता जाणवत आहे. केळी ची आवक ही फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाढणार आहे. एकदा की वातावरणातील तापमान वाढले की केळी निर्यातीला सुद्धा चांगल्या प्रकारे चालना मिळेल. परदेशात काही कंपन्या तर निर्यातीची तयारी सुद्धा करीत आहेत त्यामुळे बाजारात मागणी वाढेल.
Share your comments