1. बातम्या

सांगली बाजारात हळदीची आवक अन् दरात घसरण

KJ Maharashtra
KJ Maharashtra
हळदीच्या दरात घसरण

हळदीच्या दरात घसरण

कोरोनामुळे सांगली बाजारात हळदीची आवक कमी होऊनही दरही उतरले आहेत. गेल्या महिन्यात साडेसतरा हजार रुपये असलेला हळदीचा दर मागील आठवड्यामध्ये सरासरी ९ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला आहे. कोरोना संसर्गामध्ये हळदीचा चांगला उपयोग होत असल्याने मध्यंतरी हळदीला मागणीही वाढली होती.

गेल्या आठवड्यात ऐतिहासिक विक्रम नोंदवत हळदीने क्विंटलला तीस हजार रुपयापर्यंत दर गाठला होता. मात्र, कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने याचा परिणाम हळदीच्या उलाढालीवर होऊ लागला आहे. वाहतुकीतील अडथळे, टाळेबंदीचे सावट यामुळे बाजारात होणारी हळदीची आवक-जावकही घटली आहे. दुसरीकडे राज्यांतर्गत होणाऱ्या माल वाहतुकीवरही कोरोनाचे सावट पसरले आहे.

 

यामुळे कर्नाटकमधून सांगलीला येणाऱ्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे आवक घटलेली असतानाही अस्थिर वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी सौद्यामध्ये भाग घेण्यासही टाळाटाळ सुरू केल्याने मागच्या गुरुवारी बाजारात केवळ ६ हजार ३४८ क्विंटल हळदीची खरेदी होत दरात मोठी घसरण झाली.

 

सांगली बाजारात गुरुवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला प्रतिक्विंटल किमान ७ हजार, तर कमाल १२ हजार ६०० रुपये दर मिळाला असून सरासरी ९ हजार ८०० रूपये दर मिळाला आहे. गेल्या महिन्यात सरासरी दर साडेसतरा हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समिती कार्यालयातून सांगण्यात आले.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters