गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी राजा निसर्गाच्या लहरीपणासमवेतच सुलतानी दडपशाहीचा सामना करीत आला आहे. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे.
अशा परिस्थितीतच शेतकरी राजा आपला उदरनिर्वाह कसा तरी भागवत आहे, आणि अशातच एका शेतकऱ्यावर मोठ संकट कोसळले आहे. सांगवी शिवारातील एकाच शेतकऱ्यांच्या गोठ्यात आग लागल्याने पूर्व मशागतीसाठी आणलेले पेरणीचे सर्व साहित्य जळून खाक झाले व दावणीला बांधलेल्या जनावरांना गंभीर दुखापत झाली आहे.
संबंधित बातमी:-लई झाक! 10 गुंठे क्षेत्रात 'हा' प्रयोगशील शेतकरी फुलशेतीमधून कमवतोय लाखों
सांगवी येथील कामाजी जाधव यांनी त्यांच्या दावणीला बांधलेल्या जनावरांसाठी गोठ्याची उभारणी केली. तसेच गोट्याचा उपयोग शेतीचे साहित्य ठेवण्यासाठी देखील होऊ शकतो म्हणून त्यांनी या गोट्याची निर्मिती केली.
मात्र, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी बांधलेल्या गोठ्यातच जनावरांना गंभीर दुखापत झाली. त्याचं झालं असं बुधवारी शॉर्टसर्किटमुळे कामाजी यांच्या गोठ्यात आग लागली. गोठ्यात लागलेल्या अग्नी तांडवामुळे कामाजी यांचे शेतीचे साहित्य बारदाने जळून खाक झाले व बैलांना गंभीर दुखापत झाली.
यामुळे कामाजी यांनी खरिपात पेरणी करायची कशी असा संतप्त सवाल उभा केला आहे. गोठ्यातील पेरणी यंत्र, इतर शेतीचे अवजारे, साठवलेले धान्य आगीमुळे राख बनलीत. यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक फटका बसला. या सदर शेतकऱ्याने या कारवाईची ताबडतोब दखल घेत नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ग्रामीण भागात सध्या अनियमित विद्युत पुरवठा सुरू आहे यामुळेच गोठ्यात आग लागली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आधीच नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यास या अग्नी तांडवामुळे हजारो रुपयांचा फटका बसला आहे.
संबंधित बातमी:-खरं काय! 'या' पिकाची लागवड करण्यासाठी सरकार देते तब्बल 30 टक्के अनुदान; पिकाला असते बारामही मागणी
Share your comments