भारतात आजच्या घडीला मध्यम आणि लघु उद्योगक्षेत्र म्हणजेच एमएसएमई क्षेत्रात व्यापक बदल होताना दिसत आहेत. व्यापार हा वित्तीय सेवांसाठी बदलाचा प्रमुख घटक होत चालला असून एमएसएमई क्षेत्रात आज वित्तपुरवठ्यात असलेली तब्बल 300 अब्ज डॉलरची तुट भरुन काढण्यासाठी सॉल्व हा प्रभावी पर्याय म्हणून उदयास आलेला आहे.
दरम्यान एमएसएमई क्षेत्र हे भारताच्या उद्योगक्षेत्राचा कणा असुन जीडीपीत त्याचा वाटा तब्बल 30 टक्के आहे. या क्षेत्रात 40 टक्के कामगारवर्ग कार्यरत आहे, तर निर्यातीत त्यांचा 40 टक्के वाटा आहे. देशातील 80 टक्के एमएसएमई क्षेत्र हे असंघटित क्षेत्रातच कार्यरत असुन त्यांची व्यवसाय कार्यप्रणाली ही डिजीटलदृष्ट्या अद्यापही शून्यच आहे. त्यामुळे भारतातील एमएसएमई क्षेत्राच्या वित्तपुरवठयात अद्यापही खुप मोठी तफावत आहे. त्यातील अवघे चार टक्के घटकच नियमित माध्यमातून वित्तपुरवठा घेत आहेत.
कोविडच्या सध्याच्या कठीण काळात अनेक छोट्या उद्योगांना त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी भांडवल आणि निधीचा तुटवडा जाणवत असताना सॉल्व बीटूबी मंचाआधारे "आता खरेदी करा, नंतर रक्कम भरा" या योजनेंतर्गंत अल्प मुदतीचे कर्जाचे पर्याय हे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला एकप्रकारे ताकद देणारे आहे. बीएनपीएलकडून त्यांना लवचिकता प्रदान केली जात असल्याने लघु उद्योग हे त्यांच्या तत्काळ गरजा या कोणत्याही आर्थिक दबावाविना तसेच देणी चुकती करण्यासाठी अधिक वेळ मिळत असल्याने सहज पुर्ण करत आहेत. सॉल्वचे बीएनपीएल साधन हे विशेषतः सुक्ष्म आणि कर्जाबाबत नवख्या असलेल्या विक्रेत्यांसाठी बीटूबी विश्वात वित्तपुरवठ्याचा अतिशय वेगवान आणि सर्वाधिक चांगला पर्याय आहे. सॉल्वच्या अॅपवर नोंदणीची प्रक्रिया अतिशय सोपी आणि वेगवान आहे.
एकदा व्यापाऱ्याने दोन मिनिटात आपली केवायसी छानणी पुर्ण करताच तो किंवा ती अन्न आणि ग्राहकपयोगी वस्तु, इलेक्र्ट्रॉनिक्स, कपडे अथवा होरेका या विविध व्यापार प्रकारात तत्काळ व्यवहारांना सुरुवात करु शकतो.व्यापाऱ्याने कोणत्याही उत्पादनासाठी घाऊक नोंदणी नोंदविताच त्याला बीएनपीएल वित्तपुरवठा सुरु होतो. त्यासाठी व्यापाऱ्याला बँक क्रेडीट कार्डचा ग्राहक असण्याची गरज नाही आणि अवघ्या एका क्लिकच्या माध्यमातून त्याच्या गरजेनुसार रक्कम दिली जाते.
Share your comments