दिवाळीच्या आधी देशात सर्वत्र एकच चर्चेला उधाण आले होते ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पैसा दुप्पट होणार, असे सांगितलं जात होते की दिवाळीच्या आनंदमयी वातावरणात शेतकऱ्यांना सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पैसा दुप्पट करून एक दिवाळी बोनस देणार आहे पण ह्या चर्चेला आता पूर्णता विराम लागताना दिसत आहे
अनेक शेतकरी संघटनानी देखील सन्मान निधी योजनेचा पैसा दुप्पट करण्याची शिफारस केली होती, मात्र केंद्रातील मोदी सरकारने ह्या चर्चेला विराम देत स्पष्ट केले होते की पीएम किसान निधीचा पैसा हा आधी जेवढा मिळत होता तेवढाच मिळत राहणार आहे. सद्धयातरी ह्या योजनेत सहा हजार रुपये वार्षिक मिळत राहणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी ह्या योजनेचा दहाव्या हफ्त्यापासून ह्या योजनेचा पैसा हा दुप्पट केला जाईल अशी शेतकऱ्यांना देखील आशा होती. अनेक जाणकार लोकांना असे वाटतं होते की शेतकऱ्यांचा केंद्रातील मोदी सरकारवर खुप रोष आहे त्यामुळे मोदी सरकार आगामी पाच राज्यातील निवडणूक मुळे शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी असा एखादा निर्णय घेईल पण तसे काही झाले नाही. हि योजना आधी जशी चालू होती तशीच पुढेही चालू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये पीएम किसान सन्मान निधी हि एक कल्याणकारी योजना अंमलात आणली. ह्या योजनेद्वारे भारतात प्रथमच शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट रक्कम जमा होणार होती, याआधी कुठल्याच सरकारने अशी योजना अंमलात आणली नव्हती. तेव्हापासून या योजनेंतर्गत 11.37 कोटी शेतकऱ्यांना 9 हप्त्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात DBT मार्फत जमा करण्यात आली. त्यामुळे ह्या योजनेत अधिकच पारदर्शकता आली असे तज्ञानी मत व्यक्त केले आहे.
कोनाला मिळणार ह्या योजनेचा लाभ
या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि भागीदारीने शेती करणाऱ्या लोकांचा समावेश केला जाईल असे देखील सांगण्यात येत होते पण सरकारने यावर स्पष्ट केले की असा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही.
आणि या किसान सन्मान योजनेचा लाभ फक्त जमीनधारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन आहे, व त्यांच्या नावाचा सातबारा आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यावरही ह्या योजनेत अशी अट अशी आहे की, राज्य सरकारने त्याची शेतकरी म्हणून पडताळणी करावी, कारण महसूल हा राज्याचा विषय आहे. एकंदरीत सध्या अशी परिस्थिती आहे की, ह्या योजनेत शेतकऱ्यांना फक्त सहा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत, सरकारने पीएम किसान सन्मान निधीचा पैसा वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही.
Share your comments