1. बातम्या

काही दिवसात पावसाचा अंदाज असल्यामुळे कृषीतज्ञांचा शेतकऱ्यांसाठी हा आहे सल्ला

हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे कि काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस बसणार आहे. त्यामुळे या पावसाचा निश्चितच परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यादरम्यान शेतात उभ्या असलेल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फवारणी करणे योग्य नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
rain

rain

हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे कि काही दिवसांनी पुन्हा अवकाळी पाऊस बसणार आहे. त्यामुळे या पावसाचा निश्चितच परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यादरम्यान शेतात उभ्या असलेल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फवारणी करणे योग्य नाही.

जर मोहरी पिकाचा विचार केला तर मोहरी लागवड केली असेल तर चापा नावाच्या किडीवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. जर अधिक प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला तर कोरड्या वातावरणात प्रति लिटर पाण्यात 0.25 मिलिमीटर  इमिडाक्लोप्रिड  मिसळून फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक प्रामुख्याने घेतले जाते. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांबूची त्रिकोणी पक्षी थांबे प्रतिक्रिया आठ लावणे गरजेचे आहे तसेच जैविक नियंत्रणासाठी एकरी दोन ते तीन कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर लावणे गरजेचे आहे.

 या काळात करपा रोगाचे नियंत्रण महत्त्वाचे

 सध्याच्या वातावरणात बटाटा आणि टोमॅटो या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. या पिकांवर करपा रोग आला तर जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे टोमॅटो आणि बटाटा पिकावरील करपा रोगावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.जर या पिकांवर करपा रोगाची लक्षणेदिसायला लागली तर कार्बेन्डाझिम प्रति लिटर एक ग्रॅम किंवा डायथेन एम-45 दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. जर कांदा पिकाचा विचार केला तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास डायथेन एम-45 फवारणी करणे योग्य आहे.

वाटाण्याची लागवड केली असेल तर वाटाण्याच्या पिकावर दोन टक्के युरिया सोलुशन फवारणी घ्यावा लागणार आहे.

 हा काळ भाजीपाला लागवडीसाठी पोषक

सध्या पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे त्यानंतर भाजीपाला लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. याकाळात भोपळा  लागवड करणे योग्य आहे. तसेच कोबी,फुलकोबी इत्यादींच्या रोपणासाठी पोषक वातावरण आहे. या हंगामामध्ये कोथिंबीर, पालक आणि मेथी यांची पेरणी करता येणार आहे.

 (संदर्भ-Tv9 मराठी)

English Summary: the agriculture expert give some advice to farmer due to rain possibilites Published on: 28 December 2021, 09:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters