सध्या हिवाळ्यात पाऊसाळा अनुभवायला भेटत आहे जे की १५ दिवसाला अवकाळी पाऊस आणि सतत बदलणारे वातावरण त्यामुळे रब्बी, खरीप हंगामातील पिकांचे व फळबागांचे नुकसान होत आहे. थंडी पडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची जोमाने वाढ सुरू आहे तर इकडे आंब्याला सुद्धा मोहर फुटलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पादन वाढावे म्हणून अनेक उपाय योजना केल्या आहेत मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मागील वर्षांपासून सारखे कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे नुकसान होत आहे. मात्र सध्या थंडी चे वातावरण असल्यामुळे आंब्याला अजून चांगला मोहर फुटणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे.
रब्बी पिकांबाबत कहीं खुशी कहीं गम:-
राज्यात रब्बी हंगामाची पेरणी होऊन महिना झाला आहे जे की पोषक वातावरण आज मुबलक प्रमाणात पाणी असल्याने रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल आणि राजमा चे पीक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हरभरा आणि राजमा ही दोन्ही पिके फुलोऱ्यात असतानाच मागील दोन दिवसापासून हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे तर राजमा आणि सूर्यफूल यांची जास्त प्रमाणात वाढ झाली नसल्याने या पिकांना धोका कमी आहे मात्र सतत पाऊसाची धार लागली तर नुकसान होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने ज्वारी झोपली आहे.
आंब्याचा मोहर बहरला:-
मागे झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कोकण विभागातील आंब्याचा मोहर गळाटलेला होता. आंब्याचे पीक दुसऱ्या टप्यात असतानाच मोहर गळायला सुरुवात झाली यामुळे शेतकऱ्यांनी जी अशा धरली होती ती मावळली गेली. परंतु आता थंडी वाढली असल्याने पुन्हा आंब्याला मोहर फुटत आहे. उशीर का होईना मात्र शेतकरी आंबा लागवड करण्यास सुरू करतील असा अंदाज आहे.
साखरेच्या उताऱ्यामध्ये नैसर्गिक वाढ:-
डिसेंम्बर च्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे जो साखरेला उतार लागला होता तो पुन्हा वाढत आहे. अवकाळी पावसाने साखर कारखान्याचे मोठे नुकसान केले होते. अपरिपक्व असणारा ऊस कारखान्यात गाळप होण्यासाठी दाखल होत होता त्यामुळे साखरेच्या उताऱ्यात १ टक्के घट होत होती. मात्र मागील ८-१० दिवसांपासून उसाच्या पट्यात थंडी वाढलेली आहे. ज्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यात झाला आहे.
Share your comments