राज्यातील महसूल तसेच कृषी विभागाच्या मतभेदांमुळे केंद्र सरकारच्या योजनेला खीळ बसलेली आहे. जरी ही योजना केंद्र सरकारची असली तरी राज्यामध्ये अमलबजावणी करण्याचे काम या दोन्ही विभागाने करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास ८ लाख ५३ हजार शेतकरी तपशिलात असणाऱ्या त्रुटींमुळे या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी तपशिलात असणाऱ्या त्रुट्या दूर कराव्यात असे केंद्र सरकारने आदेश दिला आहे. २५ मार्च रोजी राज्यात शिबिर राबवून शेतकऱ्यांच्या ज्या तृट्या आहेत त्या जाणून घेतल्या जाणार आहेत. महसूल विभागाला ३१ मार्च पर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. तसेच या शिबिरात जे अपात्र शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची कागदपत्रे सुद्धा जमा करून परतावा माघारी घेतला जाणार आहे.
कृषी आयुक्तांच्या पत्रात दडलयं काय ?
पंतप्रधान किसान सन्मान योजना ही २०१६ पासून शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे ने की या योजनेचा लाभ अल्पभूधारक तसेच गरजवंत शेतकऱ्यांना मिळावा म्हणून चालू केली होती. परंतु शेतकऱ्यांच्या तपशिलात असणाऱ्या तृट्या दूर करण्याची जबाबदारी महसूल आणि कृषी विभागाकडे होती. मात्र स्थानिक पातळीवर काहीच झाले नसल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तर जे नागरिक आयकर अदा करतात ते लाभ घेत आहेत. ही गोष्ट निदर्शनास येताच आता २५ मार्च ला जे शिबिर आयोजित केले आहेत त्या शिबिरात शेतकऱ्यांच्या तपशिलात ज्या तृट्या आहेत त्या दूर केल्या जातील. कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्हाधिकारी वर्गाला पत्र लिहले आहे जे की २५ मार्च रोजी गावस्तरावर शिबिर घेऊन शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करावी.
शेतकऱ्यांना नेमके करायचे काय ?
जो पर्यंत महसूल तसेच कृषी विभागाकडून आयोजित केले जाणारे जे शिबिर आहे ते जो पर्यंत पार पडत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही कागदपत्र जमा करू नये जे की याबद्धल माहिती मोबाईलवर एसएमसद्वारे दिली जाणार आहे. कागदपत्रात बॅंकेचे पसबुक, चेक, आधारकार्ड, सात-बारा उतारा, आठ ‘अ’ ही द्यावी लागणार आहेत. तसेच शिबिरादरम्यान जे अधिकारी कागदपत्रे मागतील ती सुद्धा शेतकऱ्यांना अदा करावी लागणार आहेत.
31 मार्च रोजी चित्र होणार स्पष्ट :-
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना कागदपत्रे शिबिरात शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच तहसील कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. ३१ मार्च पर्यंत हे काम पूर्ण करावे लागणार आहेत तरच शेतकऱ्यांच्या नावावर ११ व हप्ता जमा होणार आहे. ३१ मार्च ला जी कागदपत्रे जमा केली जाणार आहात त्यानुसार शेतकऱ्यांना हप्ता का मिळाला नाही याची माहिती समजली की जमा केलेली कागदपत्रे वरीष्ठ पातळीवर जातील.
Share your comments