जानेवारी महिन्यात पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १० वा हप्ता जमा झाला आहे जे की तीन महिन्यानंतर ११ व्या हप्त्याची चर्चा सुरू आहे मात्र हा हप्ता जमा होण्याआधी सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले आहेत, जे की या बदलाची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. ११ व हप्ता जर शेतकऱ्यांना मिळवायचा असेल तर ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. परंतु सीएसी केंद्रावर काही अडचनी निर्माण होत आहेत. जे की ई-केवायसी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीन ची गरज लागते पण तेही उपकरण बंद आहे त्यामुळे शेतकऱ्याना ई-केवायसी करता येत नाहीत. २५ मार्च रोजी जे शिबिर राबविण्यात आले आहे त्यामध्ये यावर पर्याय काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्यांकडे फक्त २० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे.
‘ई-केवायसी’ नेमक्या अडचणी काय?
ई-केवायसी प्रक्रिया करायची असेल तर ती एक तर ऑनलाइन करता येते किंवा सीएससी केंद्रावर जाऊन करावी लागते. जास्तीत जास्त शेतकरी हे केंद्रावर जातात परंतु जास्त गर्दी असल्याने शेतकऱ्यांना खूप वेळ बसावे लागते. कधी साईट चा सर्वर जाम असतो तर कधी ई-केवायसी प्रक्रिया दरम्यान साईट बंद होते. काही शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नाही तर दोन ते तीन दिवस बायोमेट्रिक चालू होते व त्यामध्ये आता समस्या निर्माण झालेल्या आहेत.
31 मार्च अखेरची मुदत :-
मार्च महिना उलटल्यानंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ वा हप्ता जमा होणार आहे. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावस्तरावर येऊन सर्वे देखील करणार आहेत. जे की शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. येणाऱ्या २० दिवसात शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मात्र शेतकऱ्यांना यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जे की या अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
अशी आहे eKYC करण्याची सोपी पध्दत :-
इकेवायसी करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची इलेक्ट्रॉनिकली ओळख पडताळून पाहणे. इकेवायसी करायची असेल तर तुम्हाला www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाईट ओपन झाली की तिथे एक इंग्रजी मध्ये सूचना दिसेल जी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres. या इंग्रजी सूचनेचा असा अर्थ आहे की तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला इकेवायसी करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत त्यामधील एक म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक जर आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला आधार बेस्ट केवायसी करता येईल. जे की यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नर मध्येह जाऊन केवायसी वर क्लिक करायचे आहे आणि जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे?
फार्मर कॉर्नर eKYC हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे नंतर आधार केवायसी चे एक पेज ओपन होईल त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकावा. यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करावे आणि समोर एक वेबपेज ओपन होईल त्यामध्ये आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर दिसेल त्या ठिकाणी जो आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकावा. GetOtp वर क्लिक करून Otp aala की तो टाकून सबमिट करा. EKYC Submitted असे दिसेल. जर invalid येत असेल तर CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करावीत आणि ekyc करून घ्यावे.
Share your comments