मध्यम शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी वर्गाला नजरेत ठेवून केंद्र सरकार योजना राबवत आहे, जे की यामधील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान योजना. २०२२ च्या नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या नावावर १० वा हप्ता जमा केला आहे. वर्षात तीन हप्ते २ हजाराचे दिले जातात म्हणजेच ३ टप्यात ६ हजार रुपये जमा केले जातात. रब्बी हंगामासाठी १० वा हप्ता उपयोगी पडलेला आहे. आता कुठेतरी वातावरण पोषक झाले असल्याने सगळीकडे मशागतीची तसेच पेरणीची कामे सुरू आहेत अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला आहे. जे या योजनेसाठी अपात्र शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता मिळाला नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा :-
जानेवारी महिन्यातच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १० व हप्ता जमा झालेले आहे जे की अनेक दिवसांपासून या हप्त्याची चर्चा चालू होती पण नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सरकारने हप्ता जमा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ७७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हप्ता जमा केला आहे. सरकारला यासाठी २२ कोटी ७५ लाख रुपयांची वर्गवारी केली आहे. २०१९ सालापासून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे जे की या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता आला आहे.
30 सप्टेंबरपूर्वीच नोंदणी करणाऱ्यांना योजनेचा लाभ :-
ज्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे त्यांच्याच खात्यावर दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेमध्ये अनेक असे लाभार्थी होते ते अपात्र होते जे की तेही या योजनेचा लाभ मिळवत होते ते शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ११ व हप्त्याची नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. कागदपत्रे जमा केली तरच ११ वा हप्ता जमा होणार आहे असे सांगितले आहे.
अखेर योजनेचा उद्देश साध्य :-
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळत असले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या ऐन गरजेदरम्यान १० वा हप्ता जमा झाला आहे. या १० व्या हप्त्याच उपयोग शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरण्या तसेच मशागत करण्यासाठी झाला आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या सांगण्यावरून केंद्र सरकारचा जो उद्देश होता तो साध्य झाल्यासारखे वाटत आहे.
Share your comments