महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दोन दिवसापासून हवामानात मोठा बदल (Climate Change) बघायला मिळतं आहे. या दोन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचे (Pre Mansoon Rain) थैमान होते दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) आगामी दोन दिवस राज्यात अजून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन ठरलेलंचं आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बुधवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे.
यामुळे सामान्य जनतेस उकाड्यापासून तूर्तास आराम मिळाला आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांना या पावसामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे उन्हाळी हंगामातील साठवलेला शेतमाल पाण्याच्या भक्षस्थानी आला आहे. यामुळे शेतपिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतं आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. विभागाने या संबंधित जिल्ह्याना यलो अलर्ट देखील जारी केला आहे.
दरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले असल्याने वातावरणात दमटपणा वाढला आहे शिवाय उकाडा देखील जनतेस मोठा त्रासदायक सिद्ध होतं आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
ढगाळ वातावरण विदर्भात तयार झाल्याने दमटपणा आणि उकाडा वाढला आहे. तर विदर्भात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरण कायम राहणार असून विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय कोकणात देखील मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Share your comments