राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा होता. आता सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे असणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामुळे आता राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे कोर्टाने हा दिलासा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी तो राजीनामा द्यायला नको होता. तो दिला त्यामुळे पुढील अडचणी वाढल्या आहेत. तसेच राज्याचे सत्तासंघर्ष प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे.
केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान, या सरकारचा मोठा निर्णय
यामुळे आता सरकार कोसळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये व्हीप फक्त राजकीय पक्ष देऊ शकतात. असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करायला हवी होती, भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे देखील म्हटले आहे.
मोठी बातमी! शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सत्तासंघर्ष प्रकरणात मोठी घडामोड..
Share your comments